अंजनगावसुर्जीची केळी निघाली साता समुद्रापार
उत्सव उद्योजक समूहातून कंटेनर दुबई ला रवाना
केळी उत्पादक शेतकऱ्यांची प्रगतिकडे वाटचाल
अंजनगावसुर्जी ( मनोहर मुरकुटे )
अंजनगाव सुर्जी तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी असून स्थानिक बाजार पेठेत होणारे भावांचे उतार चढाव यावरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचणारा व शेती नियोजनातून दर्जेदार मालाचे उत्पादन करून आपण स्थानिक बाजारभावापेक्षा अधिक भाव मिळवून सातासमुद्रापार आपले उत्पादन पोहचावे यासाठी येथील उद्योजक उत्सव उद्योग समूहाचे प्रवीण नेमाडे यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले व त्याची फलश्रुती शुक्रवारी (ता.१०) येथील उत्सव उद्योजक समूहातून विस टन केळीचा माल दुबई ला रवाना झाला असुन यामुळे तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मीळणार आहे.
*********अंजनगावसुर्जी तालुक्यात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते परंतू भावाच्या अस्थिरतेमुळे येथील शेतकरी नेहमी मेटाकुटीस येतो.स्थानीक बोर्डावर असणारे भाव आणि आंतरराष्ट्रीय भाव यांच्यात मोठी तफावत बघायला मिळते परंतू आंतरराष्ट्रीय बाजारात जर केळी न्यायची असेल तर तीला तो दर्जा असायला हवा,आंतरराष्ट्रीय मानकामध्ये ती असायला हवी यासाठी शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनात तसे मार्गदर्शन उत्सव उद्योग समुहातर्फे करण्यात आले,ज्यामुळे शेतकऱ्यांना मालाचा दर्जा पाहून प्रती क्विटलमागे दोनशे रुपयाचा अतिरिक्त फायदा होईल.शुक्रवारी (ता.१०) रवाना झालेला केळीचा कन्टेनर हा दुबई आणि नेपाळला गेला असुन यासाठी टी. क्लस्टर प्रायव्हेट लीमीटेडचे संचालक अमोल हेंड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.प्रविण नेमाडे यांना त्यांचे वडील देविदास नेमाडे यांचे मार्गदर्शनात तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी म्हाणुन ओळखले जाते कन्टेनरला रवाना करतांना देविदास नेमाडे, प्रविण नेमाडे,कमलेश पटेल,अमोल हेंड,प्रणीत कुबडे,उमेश पटेल,दिलीप नेमाडे,गौरव नेमाडे,आशिक अन्सारी,विनोद खारोडे,काशीनाथ राउत,सह अनेक शेतकरी उपस्थित होते
*
शेतकऱ्यांनी दर्जेदार माल आपल्या शेतात तयार केल्यास त्याला आंतराष्ट्रिय बाजारात चांगला भाव मीळवून आर्थिक सुबत्ता आपण मिळवू शकतो.फक्त यामध्ये शेतकऱ्यांनी सातत्य ठेवणे आवश्यक असुन उत्सव समुह शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तयार असेल असे प्रविण नेमाडे यांनी सांगितले.