क्राइम

3 मोटर सायकलासह चोरट्यास पकडले

Spread the love

1 लाखाचा मुद्देमाल जप्त, शहर डीबी पथकाची कारवाई
यवतमाळ, ब्युरो
यवतमाळ शहर पोलिस स्टेशन ह‌द्दीमध्ये मागील काही दिवसापासुन मोटर सायकल चोरी जाण्याचे सत्र सुरु होते. अखेर यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे़ त्याच्याकडून तीन मोटारसायकल व 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई शहर डीबी पथकाने 10 मे रोजी केली़
उमेश विठ्ठल कणसे रा. वंजारी फैल यवतमाळ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे़
यवतमाळ शहर पोलिसात सचिन श्रीराम आखरे रा. दाभा पहुर ता. बाभुळगाब यांच्या मालकीची एमएच 29 एएफ 8552, राहुल विनायकराव राजुरे रा.जवळा ता. आर्णी यांच्या मालकीची एएच 29 बीजी 3384, व भुषण महेद्र भगत रा. पाटीपुरा यवतमाळ यांच्या मालकीची अॅक्टिवा एमएच 29 एक्यु 7020 या दुचाकी चोरी झाल्या़ याबाबत संबंधीतांनी पोलिसात तक्रार केल़ी या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आपले तपासचक्र सुरू केले़
डि.बी पथक यांनी पोलीस स्टेशन परिसरात गुप्तहेर व तांत्रीक बाबीचे मदत घेवुन मिळालेल्या माहितीच्या आधारे उमेश विठ्ठल कणसे रा. वंजारी फैल यवतमाळ यास ताब्यात घेवुन घेतले़ त्याच्याकडे मोटारसायकल चोरीबाबत कसुन तपास केला असता त्याने स्टेट बैंक चौक, शासकिय रुग्णालय येथुन 3 मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली़ घटनेतील तीनही दुचाकी जप्त करण्यात आल्या़
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, पोलीस निरीक्षक सतीष चवरे यांचे मार्गदर्शनात डि.बी पथक प्रमुख सपोनी संजय आत्राम, सपोनी प्रकाश पाटील, अन्सार बेग, प्रदिप नाईकवाडे, रावसाहेब शेंडे, अश्विन पवार, मिलींद दरेकर, गौरव ठाकरे, प्रदिप कुरडकर अभिषेक वानखडे यांनी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close