विजय डंभारे सरांचा सेवापूर्ती सोहळा पांढूर्णा बू येथे थाटात संपन्न
घाटंजी ता प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
विद्यादान श्रेष्ठदान, अशा श्रेष्ठ दानकर्यात वाहून घेत विद्यादानातून विद्यार्थी घडवणारे पांढूर्णा बू मेथिल शिक्षक विजयायणराव डंभारे हे नियत वयोमानानुसार दि. 30-04-2024 रोजी जिल्हा परिषद सेवेतून निवृत्त झाल्यामुळे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पांडुर्णा बू व ग्रामवासी यांच्या सौजन्याने त्यांचा भव्य असा सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रम प्रसंगी विजय नारायणराव डंभारे यांचा सहपरिवार शाल श्रीफल वह भेटवस्तु देत गौरव करण्यात आला. या सोहळ्यात पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. सुधाकर वांढरे, पांडुर्णा बू, केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. सुनिल बोंडे यांनी विजय डंभारे यांचा सपत्निक गौरव करुन त्यांच्या सेवाकाळातील कार्याची माहिती विषद केली. विजय डेभारे यांनी त्यांच्या 35 वर्षाच्या सेवाकाळात पंचायत समिती दिग्रस, महाळुंगी पंचायत समिती आर्णी, नाईनगर पंचायत समिती घाटंजी, पांगरा, रामपूर, शिरोली, आणि पांडुर्णा बू, येथे विद्यादान कार्य केले. सेवाकाळात मिळालेले सहकारी, गावकरी आणि विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी अविनाश खरतडे केंद्रप्रमुख यांनी डंभारे सरांच्या जीवनातील कार्य व आठवणी त्यांच्या विचारात मांडून त्यांचा जीवन परिचय करून दिला. सेवापुर्ती व सहकौटुंबिक सत्कार सोहळ्याचे आयोजन पांडुर्णा बू, येथील मुख्याध्यापक विठ्ठल राठोड, राजू नगराळे, दत्ता ठाकरे, वसंत जाधव, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व गावकरी यांनी खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडला.कार्यक्रमाची सांगता भोजनानी केली. या कार्यक्रमासाठी पांडुर्णा केंद्रातील सर्व शिक्षक, शिक्षिका, गावकरी व संपूर्ण विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
०००००००००००००००००