हटके

शप्तशृंगी गडावरून उडी मारत प्रेमी युगलांनी संपवले जीवन 

Spread the love

नाशिक / नवप्रहार मीडिया 

मागील सात दिवसां पासून बेपत्ता असलेल्या प्रेमी युगलांचा शोध लागला खरा पण त्यांच्या कुटुंबिय्यांच्या हाती आता त्यांचे मृतदेहच लागणार आहे. कारण या प्रेमी युगलान सप्तशृंगी च्या गडावरील अहितकड्यावरून उडी घेऊन आपले जीवन संपवले आहे. मुलीचा मरीतदेह कांद्याच्या खाली असलेल्या एका झाडावर लटकला होता. तर तरुणाचा मृतदेह पायथ्याशी पडला होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगेश राजाराम शिंदे आणि प्रियांका संतोष तिडके अशी आत्महत्या केलेल्या तरुण तरुणीची नावे आहेत. तरुण २४ वर्षे वयाचा तर तरुणी १६ वर्षांची होती. मंगेश आणि प्रियांका दुचाकीवरून २८ एप्रिलला सप्तश्रृंगी गडावर आले होते. दोघांनी सप्तश्रृंगी गडावर शीतकडा इथून उडी मारून आत्महत्या केली.

बेपत्ता झाल्यानंतर आठवड्याभराने प्रेमीयुगुलाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. गडाच्या पायथ्याला असणाऱ्या भातोडे इथल्या गुराख्यांनी याची माहिती पोलीस पाटील विजय चव्हाण यांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह दरीतून बाहेर काढले. मृतदेह कुजले असल्यानं जागीच शवविच्छेदन करण्यात आले.

मंगेश आणि प्रियांका यांचे एकमेकांवर प्रेम होते अशी माहिती समोर आलीय. ते २८ एप्रिलपासून बेपत्ता होते. याबाबत कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिलीय की नाही याची माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान, दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर त्यांच्याजवळ असलेल्या साहित्यावरून त्यांची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास केला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close