बाल सुसंस्कार सर्वागीण विकास शिबीर
श्री क्षेत्र भाडगणी / प्रतिनिधी
आधुनिक युगामध्ये आजचा तरुण व्यसनाधीन होत आहे. आपली संस्कृती व संस्कार विसरत आहे. जिवनाची योग्य दिशा कळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बाल मनावर शालेय शिक्षणाबरोबर संताचे विचार व आचार तसेच शुरविरांचे चरित्रे यांची त्यांच्या जिवनात अत्यंत आवश्यकता आहे. हाच हेतु डोळ्यासमोर ठेवून श्रीदत्त संस्थान भाडगणी येथे आज दि. 03 मे 2024 शुक्रवार रोजी शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक *श्री सचिन भाऊ तायडे* ( सचिव मराठा सेवा संघ, बुलडाणा) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शिबीराचे शिक्षण वृद विष्णु महाराज शेगाव, प्रशांत महाराज, आळंदी, शंकर महाराज खोडके व संस्थानाचे अध्यक्ष महादेव महाराज खोडके तसेच संस्थानचे विश्वस्त मंडळ, पालक वर्ग, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ श्रीकांत खोडके यांनी केले