विदेश
Related Articles
Check Also
Close
-
एकट्या व्यक्तीने केला देश निर्माण
July 6, 2025
कराची / नवप्रहार डेस्क
लग्न हा भविष्याचा निर्णय असतो. त्यामुळे लग्नाचा निर्णय हा विचार करूनच घेतला जातो. सहसा मुलगी असो वा मुलगा यो जोडीदार निवडतांना तो आपल्या समकक्ष असावा असा विचार करतो. त्यातल्या त्यात मुलगी किंवा मुलगी डॉक्टर, आयएएस, आयपीएस असले की मग तर विचारता सोया नसते. पण एका डॉक्टर महिलेने सफाई कर्मचाऱ्याला आपला जोडीदार बनवला आहे. मुख्य म्हणजे महिलेने स्वतः त्याला प्रपोज केले आहे.
या कपल ने प्रेम असेल तर या कशाचीच गरज नाही, प्रेमासमोर हे सर्वकाही क्षुल्लक आहे हे दाखवून दिलं आहे. एका डॉक्टर महिलेने हॉस्पिटलमधील सफाई कर्मचाऱ्याशी लग्न केलं आहे.
डॉक्टर किश्वर आणि सफाई कर्मचारी शाहाजाद हे कपल सोशल मीडियावर चर्चेत आहे. ओकारातील दीपालपूरमध्ये राहणारं हे कपल. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नही केलं. त्यांच्या अनोख्या लव्हस्टोरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. जिथं त्यांनी आपली अजब प्रेमाची गजब कहाणी सांगितली आहे.
कसं जुळलं डॉक्टर-सफाई कर्मचाऱ्यांचं प्रेम?
डॉक्टर किश्वर ज्या रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होती, तिथं शहजादसाफसफाईचं काम करायचा. डॉ. किश्वरने एकदा शहजादचा फोन नंबर मागितला आणि दोघांमध्ये बोलणं होऊ लागलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एमबीबीएससारखं उच्च शिक्षण घेणाऱ्या डॉ. किश्वरनेच शहजादला प्रपोज केलं. एक दिवस शहजादला तिने आपल्या रूममध्ये बोलावलं आपलं प्रेम व्यक्त केलं. डॉक्टर असलेल्या किश्वरने प्रपोज केल्याने शहजादलाही धक्का बसला. त्याला तापही आला होता. पण त्यालाही ती आवडत होती. त्यामुळे अखेर त्या दोघांनी लग्न केलं.
काय म्हणालं हे कपल?
डॉक्टर किश्वर आपल्या नवरा शहजादचं खूप कौतुक करते. ती सांगते, “शहजाद आपल्याला क्लिनर किंवा चहावाला वाटत नाही. त्याच्या वागणुकीवर मी फिदा झाले”. तर शाहजादला म्हणतो, “डॉ. किश्वर त्याला खूप खूप सुंदर वाटायची. पण ती आपल्या प्रेमात पडेल, आपल्याशी लग्न करेल असा विचारही मी कधी केला नव्हता. पण नशीबात जे लिहिलं होतं, ते घडलं”
आता डॉक्टर आणि चहावाल्याचं लग्न हे अनेकांच्या पचनी न पडणारं आहे. त्यामुळे लग्नानंतर किश्वरला रुग्णालयातील नोकरी सोडावी लागली, कारण त्यांना समाजाकडून खूप ऐकावं लागायचं. आता ते स्वतःचं क्लिनिक खोलण्याचा विचार करत आहेत. दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना अनेकांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. इथं पाहा कपलचा व्हिडीओ.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!