देशातील विकासात्मक उणीवा भरुन काढणार.– अमोल कोमावार
यवतमाळ वार्ता
अरविंद वानखेडे
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, मात्र नागरीकांच्या प्राथमिक गरजा पुर्ण झालेल्या नाही. त्यामुळे आम्ही हिन्दराष्ट्र संघाच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण, आरोग्य तसेच शेती मध्ये धोरणात्मक बदल घडवून आनण्याचा आमचा मानस असून त्याकरीता “ना धर्म ना जात, मानवता कि बात” या तत्वावर आम्ही पाच राज्यात निवडणूक लढवित असल्याची माहिती यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे हिन्दराष्ट्र संघाचे अधिकृत उमेदवार अमोल कोमावार यांनी दिली. ते यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते.
जानेवारी 2024 मध्ये देशपातळीवर हिन्दराष्ट्र संघाची स्थापना करण्यात आली. सध्या तरी पाच राज्यात उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवित आहे. महाराष्ट्रात वर्धा, यवतमाळ, पुणे तसेच उस्मानाबाद येथे निवडणूक लढविली जात आहे. यापुढे विधानसभा निवडणूक सुध्दा लढविली जाणार असल्याची माहिती अमोर कोमावार यांनी दिली. आजही गरीबांना शिक्षणाचा मुलभूत अधिकार मिळालेला नाही. भारतातील वैदीक शिक्षणाचा इतर देशात सन्मान केला जातो मात्र आपल्याच देशात याबाबत अनभिज्ञता आहे. त्यामुळे गुरुकूल पध्दती सुरु व्हावी याकरीता हिन्दराष्ट्र संघ प्रयत्न करणार आहे. आज देशात लोकशाही संपुष्टात आल्यासारखी गत झाली आहे. नागरीकांच्या मुलभूत गरजा पुर्ण केल्या जात नाही. बेरोजगारांची अवस्था अत्यंत वाईट आहे. प्रत्तेक निवडणूकीत तेच तेच मुद्दे सांगीतले जातात मात्र अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच मतदारांना जागृत करुन त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे कोमावार यांनी सांगीतले.