हटके

अरे बाबो…! एक कोटी किमतीच्या कार ला त्याने भररस्त्यात पेट्रोल टाकून लावली आग

Spread the love
 

हैदराबाद  / नवप्रहार डेस्क 

              कोणाच्या डोक्यात सनक आली तर तो काय करेल याचा काही नेम नसतो. याच गोष्टीची प्रचिती देणारी घटना तेलंगाणा ची राजधानी असलेल्या हैदरबाद येथे घडली आहे. येथे एका व्यक्तीने ट्रायल घेण्याच्या बहाण्याने लॅम्बोर्गिनी  गाडी नेत भररस्त्यात पेट्रोल टाकून ती पेटवून दिली.ज्याने हे कृत्य केले त्यांचे गाडी मालकाकडे पैसे उधार असल्याचे काळात आहे.
हैदराबादच्या पहारी शरीफ भागात 13 एप्रिल रोजी ही घटना घडली. 2009 मॉडेलच्या या स्पोर्ट्स कारची किंमत सुमारे 1 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पिवळी लॅम्बोर्गिनी रस्त्याच्या मधोमध जळताना दिसत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार मालकाने आपल्या मित्रांना ती विकण्याच्या उद्देशाने खरेदीदार शोधण्यास सांगितलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, कारच्या मालकाकडे काही उधार पैसे होते. कर्ज देणारी व्यक्ती गाडीचा खरेदीदार असल्याचं भासवत त्याच्याकडे आली आणि कार एअरपोर्ट रोडवर नेऊन पेटवून दिली.
पोलिसांनी सांगितलं की 13 एप्रिल रोजी संध्याकाळी ही लॅम्बोर्गिनी कार हैदराबादच्या बाहेरील भाग मामिदिपल्ली रोडवर आणली गेली. तेव्हा त्या व्यक्तीने कथितपणे इतर लोकांसह त्यावर पेट्रोल शिंपडलं आणि आग लावली. त्या व्यक्तीचा दावा आहे, की कार मालकाने त्याचे पैसे दिलेले नाहीत. कार घेणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे, आयपीसी कलम 435 (दुखापत करण्याच्या उद्देशाने आग किंवा स्फोटक पदार्थाने दुष्कृत्य करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासानंतर संपूर्ण माहिती कळेल, असं पोलिसांनी सांगितलं.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close