सामाजिक

भीमजयंती उत्सवाने दुमदुमली बडनेरा नगरी

Spread the love

नितीन कदम यांच्या संकल्प शेतकरी संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम*

प्रतिनीधी / अमरावती

सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात साजरी झाली. दरम्यान बडनेरा शहर व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा साजरा करण्यात आला.त्यावेळी नितीन कदम यांनी बडनेरा विविध भागांमध्ये बौद्ध विहारामध्ये भेटी देत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले. दरम्यान नितीन कदम यांच्या संकल्प शेतकरी संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.तसेच संध्याकाळी रस्त्यावर मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शांततेत आणि नियमांचे पालन करून पार पडली. बडनेरा शहर व ग्रामीण परीसरात ठिकठिकाणी अभिवादन सभा, ग्रंथप्रदर्शन आणि मुक्त वाचनकटय़ाचे आयोजन करण्यात आले होते. नितीन कदम यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाची आणि संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, करुणा आणि सहिष्णुता या मूल्यांच्या आधारे घटनेचे मर्म विशद केले.
यावेळी नितीन कदम, पर्वेश कदम, स्वप्निल मालधुरे, अभिजित सवाई,बाबा पाटील, गणेश काळे, प्रल्हाद सरोदे, दिनेश ठाकरे, नगरसेवक शफीभाई, नामदेव डगवाळे, उमेश मानकर, दीपक गावंडे, विनोद पतालिया, प्रकाश गोरटे, जयंत पवार, साचिन देशमुख, किशोर सरोदे, मोहन भातकुलकर, परेश मोहोळ, शंकर बडगे, प्रफुल महल्ले, सोपान भटकर, आकाश मानकर, कृष्णा वानखडे, बाबू गावनेर, गजानन लेंडे, गजानन सवाई, बन्सी लाठी, सुभाष बंते, विश्वास पाटील, बाबुलाल वानखडे, सागर पंचबुद्धे, किशोर जोगी, रोशन सनके, विनोद अघम, राहुल वानखडे, संदीप कोलटेके, भोजराज कोलटेके, धीरज देशमुख, प्रदीप मोहोळ, अर्पण भजभुजे, चेतन रेहपाडे व ईतर संकल्प शेतकरी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close