Uncategorized

आज पिंपळखुटा येथे प्रबोधनापर भजन संध्येचे आयोजन

Spread the love
मागील १० वर्षांपासून सुरू आहे सेवा 
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
             आज श्रीक्षेत्र पिंपळखुटा येथे भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे.
विदर्भातील प्रसिद्ध गायक यशवंत पाटील आणि संगीताजी यांकग्या सुमधुर वाणीतून श्रोत्यांना एका पेक्षा एक भजनाचा आनंद घेता येणार आहे.
               आज १४ एप्रिल २०२४ ला श्री क्षेत्र पिंपळखुटा येथे भजनांच्या माध्यमातून प्रबोधन या धर्तीवर भजन संध्येचे आयोजन रात्री ९वा। करण्यात आले आहे. हा कार्यक्रम म्हणजे केवळ ईश्वर भक्ती नव्हे तर यातून अंधश्रद्धा निर्मूलन , हुंडाबळी, राष्ट्रसंतांचे विचार प्रबोधन, व्यसनमुक्ती यावर समाज प्रबोधन केल्या जाते.
                  सदर कार्यक्रम हा मागील १० वर्षांपासून सुरू असून यंदा कार्यक्रमाचे ११ वे वर्ष आहे. जनतेने जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close