भ्रष्ट्राचार

अधिकारी निवडणुकीत ‘ बिझी ‘ वाळू माफिया वाळू उपस्यासाठी  ‘क्रेझी ‘ 

Spread the love
गोकुलसरा , चिंचोली, विटाळा, वकनाथ घाटातून खुलेआम वाळू उपसा 
वाळू माफियां ‘ चुस्त ‘ तर प्रशासन  ‘सुस्त ‘ 
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 
                  प्रशासन  निववडणूक कार्यक्रमात ‘ बिझी ‘ असल्याचा गैरफायदा उचलत वाळू माफिया वाळू काढण्यासाठी ‘ क्रेझी ‘ असल्याचे पाहायला मिळत आहे. वाळू माफिया  ‘ चुस्त ‘ तर प्रशासन  ‘सुस्त ‘ तालुक्यात एकंदरीत अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
                   तालुक्यातील गोकुलसरा, बोरगाव निस्ताने आणि दिघी महल्ले घाटा व्यतिरिक्त अन्य कुठल्याही घाटांचा लिलाव झाला नसतांना सुद्धा वाळू माफियांकडून वाळूचा अवैध उपसा जोमात सुरू आहे.
चिंचोली, वकनाथ, विटाळा घाटातून अहोरात्र वाळू उपसा – चिंचोली ,वकनाथ आणि विटाळा घाटांचा लिलाव झाला नसतांना देखील येथून अहोरात्र वाळू उपसा सुरू आहे.
विटाळा, चिंचोली, वकनाथ आणि नाल्यातूम अहोरात्र उपसा – चिंचोली, विटाळा वकनाथ आणि तालुक्यातील लहान मोठ्या नदी नाल्यातून अहोरात्र वाळू उपसा सुरू आहे.
पुलगाव येथील वाळू माफियांना हाताशी घेऊन सुरू आहे अवैध उपसा – वर्धा आणि अमरावती जिल्ह्याला विभागणाऱ्या वर्धा नदीचा अर्धा भाग वर्धा जिल्ह्यात तर अर्धा अमरावती जिल्ह्यात येतो. नदी पात्रात सीमांकन करणे शक्य नसल्याने वाळू माफियांना हातमिळवणी करूनच वाळू चोरी करावी लागते. अमरावती जिल्ह्यातील वाळू माफियांनी वाळू चोरी सुरू केली की वर्धा जिल्ह्यातील माफिया त्यांची तक्रार करतात.हाच प्रकार वर्धा जिल्ह्याच्या वाळू माफिया सोबत देखील घडतो. त्यामुळे एकमेकांशी हात मिळवणी केल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो.
वाळू माफिया ‘चुस्त ‘ तर प्रशासन ‘ सुस्त ‘– सध्या निवडणुका असल्याने महसूल प्रशासन अवैध वाळू चोरी कडे लक्ष देऊ शकत नसले ही सत्यता असली तरी ईतर वेळेस देखील ते वाळू चोरी कडे फारसे लक्ष देत नाही .
कोतवाल पासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळतो नियमित देणगी – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कोतवाल ते जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही घेऊन देऊन चालत असल्याने आमच्या कितीही तक्रारी झाल्या तरी आमचे काहीच वाकडे होऊ शकत नाही असे  वाळू माफिया छातीठोक पणे सांगतात.(क्रमशः)
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close