क्राइम

OYO हॉटेल  ‘ शितल ‘ मध्ये  सुरू होता ‘ गरमागरम ‘  व्यवसाय

Spread the love
काम देण्याच्या बहाण्याने बिहार वरून आणल्या जातात होत्या अल्पवयीन मुली आणि महिला 
नोएडा / नवप्रहार डेस्क
            काम उपलब्ध करून देण्याचा बहाण्याने बिहार मधून अल्पवयीन मुली आणि महिलांना बोलावून त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.  बहलोल येथील OYO हॉटेल ‘ शीतल ‘ मध्ये हा ‘ गरमागरम ‘ व्यवसाय सुरू होता.

देहव्यवसाय करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तीन जण सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी ४ अल्पवयीन मुलींसह सात महिलांची सुटका केली आहे. नोएडा सेक्टर -६३ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बहलोलपूर गावातील ओयो हॉटेलमध्ये हे प्रकरण सुरु होते. आरोपी बिहारमधून मुलींना बहाण्याने आणायचे आणि त्यांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडायचे.

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि मानव तस्करी विरोधी पथकाला बुधवारी माहिती मिळाली होती की बहलोलपूर गावात असलेल्या ओयो हॉटेल शीतलमध्ये वेश्याव्यवसाय होत आहे. हे हॉटेल फरमान आणि त्याचा भाऊ फैयाज चालवत होते. हे लोक बिहारमधून अल्पवयीन मुलींना नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने दिल्ली-एनसीआरमध्ये आणायचे आणि त्यांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडायचे.
यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. तेथून पोलिसांनी अझरुद्दीन उर्फ ​​अज्जू, अख्तर मोहम्मद, सुमित कुमार, धर्मेंद्र कुमार, मोहम्मद फैयाज, फरमान आणि मरगूम आलम यांना अटक केली. हॉटेलच्या इमारतीचा मालक सुरेंद्र यादव, रुखसाना आणि हॉटेलचालकांना मुली पुरवणारे रेहमान उर्फ ​​बल्लू भाई फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हॉटेलमधून 16 ते 17 वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. बिहारमधून नोकरीचे आमिष दाखवून नोएडा येथे आणल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले. आरोपींच्या चौकशीत ते ग्राहकांकडून एक ते दोन हजार रुपये घेत असल्याचे उघड झाले. किशोरवयीन मुली व महिलांनी विरोध केल्यास त्यांना धमकावण्यात आले. पोलिसांनी हॉटेलमधून एक डायरीही जप्त केली, ज्यामध्ये त्यांच्या ग्राहकांची यादी होती. हिंन्दुस्तान लाईव्हने याबाबत वृत्त
पोलिसांनी घटनास्थळावरून 11 मोबाईल फोन, 12,110 रुपये आणि आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत. आरोपींच्या मोबाईलच्या आधारे या टोळीत आणखी किती जणांचा समावेश आहे, याचाही शोध पोलीस घेत आहेत. तपासादरम्यान पोलिसांना अनेक प्रसिद्ध लोकांचीही माहिती मिळाली, जे येथे येत असत. आरोपींना गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले, अशी माहिती पोलीस स्टेशन प्रभारींनी दिली. तेथून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close