दिव्यांग बांधवास नितीन कदम यांचेतर्फे स्वयंचलीत सायकल प्रदान
वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या विचारावर आधारित अनेक वर्षांपासून अविरत सेवा*
प्रतिनिधि / अमरावती
गेल्या कित्येक वर्षापासून नितीन कदम यांची सामाजिक सेवा संपूर्ण विदर्भात प्रचलित आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्या दिव्याग बांधव मदत उपक्रमात पाचशेचा आकडा ओलांडला असताना पूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता..*
*बडनेरा ग्रामीण भागातील अंजनगाव बारी येथिल दिव्याग बांधवांस अत्याधुनिक नवतंत्रज्ञानयुक्त सायकल प्रदान करण्यात आली.बडनेरा ग्रामीण भागातील सर्वसमावेशक समाजाचा दृष्टीकोन तयार करणे, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांचे सक्षमीकरण आणि सन्माननीय जीवन सुनिश्चित करणे हा या कार्यक्रमाचा आयोजन करण्यामागील हेतू आहे. दिव्यांग व्यक्तींना समान संधी उपलब्ध करून देणे, त्यांना उत्पादक, सुरक्षित आणि सन्माननीय जीवन जगण्याची संधी देणे हा या मागचा मुख्य नितीन कदम यांचा उद्देश आहे.*
*लाभार्थ्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाकलित करण्यासाठी सक्षम बनवणे हा या सहाय्यक उपकरणांचा उद्देश आहे.नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठीनितीन कदम यांच्या जाहीर ‘संकल्प’ योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे यासाठी ते नेहमी आग्रही असतात. या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे.दिव्यांग व्यक्तींसाठी विविध संकल्प शेतकरी संघटनेमार्फत नितीन कदम यांच्या नेतृत्वात लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावणेसाठी उपक्रम राबविण्याचे काहीं वर्षाआधी निश्चित झाले होते. आत्तापर्यंत त्यांनी पाचशेहून अधिक दिव्यांग् बांधवांना स्वयंचलित नवतंत्रज्ञानयुक्त सायकली वाटप करून सर्वांची मने जिंकली. यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे सचिव पर्वेश कदम स्वप्निल मालधूरे,अभिषेक सवाई, मोहन भातकुलकर,विकास वायकर, प्रशांत तलमले, भास्करराव गभणे, प्रफुल कदम, अक्षय वायकर, रोशन जोंबळे, मनोज सोनार, नितीन नवघरे, प्रशांत कुंभलकर, मनोज कुंभलकर व ईतर नागरिक उपस्थित होते.