क्राइम

पॉर्न व्हिडीओ तयार करणाऱ्या आरोपींना साहित्यासह अटक 

Spread the love

आरोपीत 5 तरुणींचा समावेश  ; साहित्य जप्त

पुणे / नवप्रहार मीडिया

इंटरनेट सुविधा उपलब्ध झालयापासून मिळणाऱ्या अश्लील साहित्यामुळे मुलं लवकर वयात यायला लागली आहेत. आणि त्यामुळे लैंगिक अत्याचारात जबरदस्त वाढ झाली आहे. आता तर काही ओटीटी प्लेटफॉर्म वर अश्लील बेवसिरीज दाखवल्या जाऊ लागल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म साठी पॉर्न व्हिडीओ बनवणाऱ्या लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. यात पाच तरुणींचा देखील समावेश आहे.

दोन दिवसांपासून लोणावळ्यातील व्हीलावर हा सर्व गोरख धंदा सुरू होता. वेगवेगळ्या राज्यांतून काही तरुण आणि तरुणी एकत्र आले होते. पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी १५ पैकी १३ जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या अश्लील ओ.टी.टी प्लॅटफॉर्मसाठी काही तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील व्हीलावर पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. भारतात पॉर्न व्हिडिओ तयार करणे कायद्याने गुन्हा आहे. पॉर्न व्हिडिओ करण्यावर बंदी आहे. असे असताना ही १५ जणांची टोळी लोणावळ्यात बिनधास्त पॉर्न व्हिडिओ तयार करत होती.

१५ जणांमध्ये पाच तरुणींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे सर्व तरुण आणि तरुणी भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील आहेत. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी व्हीलावर छापा टाकून १३ जणांना अटक केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावरून पॉर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close