ब्रेकिंग न्यूज

चिंचोली येथील वाळू तस्करांचा ‘ हम नही सुधरेंगे ‘ चा पाढा 

Spread the love
काही दिवसांपूर्वी कारवाई मुळे बंद असलेला अवैध वाळू उपसा पुन्हा सुरू 
महसूल आणि पोलीस विभागाला ‘खिशात ‘ ठेवत असल्याची बोलभाषा  
अधिकारी निवडणुकीत व्यस्त असल्याचा मोठ्या प्रमाणावर उचलणार फायदा ? 
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 
                तालुक्यात वाळू तस्करी साठी  कुप्रसिद्ध असलेल्या चिंचोली घाटातून ‘ ब्रेक ‘ नंतर पुन्हा अवैध वाळू उपसा सुरू झाला आहे.  वाळू तस्करीतून कथित रित्या स्वतःला डॉन म्हणवून घेणारे अडकणे आणि बमनोटे यांनी आता खुलेआम महसूल आणि पोलीस प्रशासनाला ‘ खिशात ‘ ठेवत असल्याची भाषा वापरत असल्याची कर्मचाऱ्यात चर्चा आहे.
          तालुक्यात गोकुलसरा वगळता कुठल्याच घाटावरून वाळू उपस्याची परवानगी नसतांना या व्यवसायात मागील काही वर्षांपासून असलेले आणि आर्थिक दृष्ट्या ‘रग्गड ‘ झालेले अडकणे आणि बमनोटे स्वतःला कथित रित्या डॉन समजू लागले आहेत. आणि खुलेआम नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करत आहेत.
अडकणे आणि बमनोटे यांचा ‘ हम नही सुधरेंगे ‘ चा पाढा –  चिंचोली वाळू घाटावर  काही दिवसांपूर्वी तहसीलदार गोविंद वाकोडे यांनी चमू सह कारवाई करत अवैध वाळू साठा जप्त करून वाळू उपस्या साठी वापरण्यात येणाऱ्या बोटी जप्त केल्या होत्या. त्यामुळे मागील काही दिवसांपासून चिंचोली घाटावर अवैध वाळू उपसा बंद होता. पण आज सकाळ पासून पुन्हा वाळू उपसा सुरु झाला आहे.
महसूल आणि पोलीस प्रशासनाला खिशात ठेवत असल्याची भाषा – आमच्या विरोधात कितीही बातम्या छापून आल्या आणि कितीही तक्रारी झाल्या तरी आमचे कोणी काहीच बिघडवू शकत नाही. कारण आम्ही त्यांना ‘ खिशात ‘ ठेवतो अशी भाषा वाळू तस्कर  वापरू लागले आहेत. ( क्रमशः)
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close