क्राइम

दारुड्या पतीने पत्नी आणि दोन मुलींना जिवंत जाळले 

Spread the love

अहमदनगर  / नवप्रहार मीडिया 

              दारूच्या नशेत  असलेल्या पतीने पत्नीआणि दोन मुलींना रिजेल टाकून जिवंत जाळल्याची घटना नगर जीह्यातील वडगाव लांडगा हेठे घडली आहे. विशेष बाब अशी की असे भयानक कृत्य करून देखील पती अंगणातील झाडाखाली निवांत बसला होता. सुनील लांडगे असे त्या नराधम पतीचे नाव आहे.

आज  सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीसह दोन मुलींना जाळल्यानंतर पती घरासमोर असलेल्या अंगणातील झाडाखाली निवांत बसला होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडगाव लांडगा इथल्या सुनील लांडगे याने त्याची वर्षीय पत्नी लिलाबाई, मुलगी साक्षी आणि खुशी यांना घरात जिवंत जाळले. नगर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील लिलाबाई लांडगे आणि त्यांच्या दोन मुली घरात असताना आरोपी सुनील लांडगे यांनी दोघांना अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

आरोपी सुनिल लांडगे तिघींना जिवंत जाळल्यानंतर दारुच्या नशेत घरासमोर असलेल्या झाडाखाली बसला होता. तसंच मी पत्नीला जाळत असताना पत्नी माझ्या पाया पडत होती असंही बडबडत होता. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल असून पंचनामा करत आहेत.

(पत्नी आणि दोन मुलींना जिवंत जाळणारा हाच तो नराधम )

पिंपळगाव लांडगा येथे सुनील लांडगे या तरुणाने दारूच्या नशेत असतानी सोमवारी सकाळी नऊ वाजता पत्नी आणि दोन मुलींना जिवंत जाळले. पत्नी लिलाबाई (वय 26 वर्ष), मुलगी साक्षी (वय 14 वर्षे) व खुशी नऊ महिने यांना मुलींना जिवंत जाळल्याच्या घटनेत पत्र्याची खोलीसुद्धा जळून खाक झाली. पोलिसांनी तिघींचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close