प्रतापदादा अडसड यांनी जवळा ते मांजरखेड रस्त्याचे केले भूमिपूजन
.तालुका प्रतिनिधी / प्रकाश रंगारी
जवळा येथून जवळच असलेल्या एका पांदण रस्त्याचे भूमिपूजन प्रतापदादा अडसड त्यांनी आपल्या विकास निधीतून एक कोटी रुपयाचा निधी पांदण रस्ता सुधारने करिता दिला. गावातील शेतकरी बांधवांची पावसाळ्यात जाण्याची सोय झाल्याबद्दल गावातील शेतकरी बांधवांनी आमदार प्रतापदादा आरसड यांच्या आभार मानले. याच वेळी गावातील लाहनुजी महाराज सप्ताह मंडपाला भेट दिली. आणि लहानुजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले.
यावेळी आमदार प्रतापदादा अडसड यांचे सोबत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बबनराव गावंडे, चांदूर रेल्वे पंचायत समितीचे सभापती प्रशांत भाऊ भेंडे,समीरभाऊ भेंडे, गजाननभाऊ जुनघरे, प्रदीपभाऊ जळीत, रोशन बोडके, जवळा ग्रामपंचायतचे सरपंच आधीमुनी बेंदले, सचिव संजयभाऊ शिरसाट पोलीस पाटील पंकजभाऊ जगताप, अमोल गुल्हाने, रवी देशमुख, रामरावजी गुल्हाने, महेंद्रभाऊ देशमुख, दामोदर चौधरी
अक्षय गडलिंग, मोहन मेश्राम, रवी गुजर, शंकर गजभिये, मज्जिदशहा फकीर, जानरावजी गुल्हाने यांची उपस्थिती होती.