ब्रेकिंग न्यूज

महायुतीतील उमेदवारीचा वर्ध्याचा तिढा सुटला.

Spread the love

 

पैलवान रामदास तडस तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात

प्रतिनिधि
आशिष इझनकर
वर्धा : वर्धा लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार यावर सर्वत्र चर्चा रंगली होती. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रामदास आंबटकर, माजी खासदार सुरेश वाघमारे या शिवाय काही पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत आली होती. पण महायुतीत दुसरी यादी जाहिर होताच या नावाना विराम मिळाला आहे. लोकसभेसाठी दोन वेळा खासदार राहीलेले रामदास तडस यांचे तिसऱ्यांदा महायुतीचा उमेदवार म्हणुन घोषणा करण्यात आली आहे. आता तडस यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तडस यांना भारतीय जनता पार्टीने वर्धा लोकसभा मतदार संघात तिसर्‍यांदा लढण्याची संधी दिली आहे. यापूर्वी काँग्रेसकडून कमलनयन बजाज व वसंत साठे यांनी वर्धा लोकसभेचे तीन वेळा नेतृत्व केले. सहज उपलब्ध अशी ख्याती मिळवलेले खा. रामदास तडस पुन्हा रिंगणात उतरले आहे.

देवळी या गावातून राजकारणाची सुरुवात करणारे रामदास तडस देवळीचे नगराध्यक्ष, विधान परिषद आमदार, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अशी पदं भूषवत राष्ट्रवादी काँग्रेसमधून 2009 मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेताच त्यांना देवळीतून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. त्यात केवळ 15 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2014 व 2019 मध्ये ते भाजपाकडून लोकसभा लढले. 2019 च्या निवडणुकीत तर त्यांनी काँग्रेसच्या उमेदाराला 1 लाख 87 हजार मतांनी हरवले होते. त्यांना तब्बल 5 लाख 75 हजार मतं मिळाली होती. वर्धा लोकसभा मतदार संघातून 1957, 1962, 1967 मध्ये काँग्रेसकडून कमलनयन बजाज त्यानंतर 1980, 1984 व 1989 मध्ये वसंत साठे यांनी वर्धा लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर तिसर्‍यांदा लोकसभा लढण्याची संधी खासदार रामदास तडस यांना मिळाली आहे.
नागरिकांना सहज उपलब्ध होऊन त्यांच्या समस्येचे निराकरण खा. तडस करीत होते. दांडगा जनसंपर्क असलेले खा. तडस यांना आपल्यालाच तिकीट मिळेल असा आत्मविश्‍वास होता. उमेदवारी मिळणार दरम्यान अपल्यापुढं आव्हान देखील नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती, वर्धा लोकसभेची तिकीट मिळावी यासाठी माजी खासदार सुरेश वाघमारे प्रयत्नरत होते तर राजेश बकाने आणि आ. डॉ. रामदास आंबटकर यांचीही नावं शेवटपर्यंत चर्चेत होती. खा. तडस यांच्या नावाची घोषण होताच त्यांच्या वर्धा येथील जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या चाहत्यांनी भेट देऊन अभिनंदन केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close