कळमगाव ग्रामपंचायत येथे जागतिक महिला दिन साजरा
बी सी आय प्रकल्प ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने”
( तालुका प्रतिनिधी ) प्रकाश रंगारी
चांदुर रेल्वे येथे जवळच असलेल्या कळमगाव ग्रामपंचायत मध्ये बी सी आय प्रकल्प विकास गंगा समाजसेवी संस्थेतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, माता रमाई व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या फोटोचे पूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाला आमंत्रित ऑड. सौ. श्रद्धाताई शिवाजी वाघ, व डॉ. श्रुतीताई सागर वाघ आणि बी सी आय प्रकल्पाचे पी. यु.व्यवस्थापक श्री. नितीन उ. बकाले प्रमुख वक्ता म्हणून लाभले होते.
डॉ. सौ. श्रुतीताई वाघ यांनी महिलांना जागृत होण्याचा सल्ला दिला. आपण सावित्रीच्या लेकी आहोत. आपण स्वतःपुरता विचार न करता समाजातील गरीब, गरजू महिलांचा सामाजिक व आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. स्वतःचा विकास करून स्वतःच्या पायावर उभे राहणे नव्हे तर त्या शिक्षणाचा निस्वार्थपणे समाजातील गरजू लोकांचा समाजाचा विकास कसा होईल. याचा विचार प्रत्येक महिलेने करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री नितीनजी उ बकाले हे महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की. महिलांनी आपले सुप्त गुण ओळखून त्याला वाव देणे आवश्यक आहे. महिलांनी आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास केलेला आहे. पुरुषापेक्षा महिला कुठेही मागं नाही. असा संदेश सुद्धा नितीनजी बकाले यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा ऑड. सौ श्रद्धाताई शिवाजी वाघ ह्या मार्गदर्शन करताना महिलांना उद्देशून म्हणाल्या की प्रत्येक महिलेला आपल्या अस्तित्वाची जाणीव असणे गरजेचे आहे. महिलांनी जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. इतकी शक्ती महिलांमध्ये आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन. आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला.कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य गण, अंगणवाडी सेविका, आणि गावातील महिला, गावातील महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने सहभाग दर्शविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी सी आय महिला शेतकरी सौ. शीलाताई सतीश वासनिक व सौ. आरतीताई पवन वाघ यांनी केले.
ह्या कार्यक्रमाचे आयोजन हे ग्रामपंचायतचे सरपंच ऑड. शिवाजीराव नरेंद्रजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बी सी आय क्षेत्र प्रवर्तक श्री सुरज अर्जुन खंगार व कळमगाव आशा स्वयंसेविका व बी सी आय सौ .वैशालीताई वाघ यांनी केले.