सामाजिक

बाप लग्न जोडून घरी येण्यापूर्वीच मुलगी शेजारच्या नातेवाईका सोबत फुर्रर्रर्रर

Spread the love

लखनऊ / नवप्रहार मीडिया 

आपल्या लग्नाचा दिवस हा प्रत्येक व्यक्तीसाठी खास असतो. मात्र, कधीकधी लग्नाच्या दिवशीच अशा काही घटना घडतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून टाकतात. बऱ्याचदा नवरी किंवा नवरदेवचं असं काहीतरी कांड करतात, जे पाहून सगळे पाहुणेही थक्क होतात.

                मुलीचे लग्न जमल्यावर बापाच्या चेहऱ्यावर  वेगळाच आनंद असतो.कारण आपली मुलगी सासरी आनंदात राहावी असे प्रत्येक वडिलांना वाटते. या प्रकरणातील मुलीच्या वडीलांनी आपल्या मुलीचे लग्न ठरवले.’ चट मंगणी पट ब्याह ‘ झाल्याने  वडिलांनी नवरदेवाला दुचाकी आणि नगदी दिली.आणि दुसऱ्याच दिवशी लग्न असल्याने त्यांनी ही बाब घरच्यांना कळवली.आणि घरी जायला निघाले. ते घरीं पोहचण्या आधीच मुलगी शेजारच्या नातेवाईकासह फुर्रर्रर झाली..

लखीमपूर खेरी येथील नीमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात लग्नाच्या दिवशीच नवरी जवळच्या नातेवाईकासोबत फरार झाली. तरुणीने दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला. संध्याकाळी लग्नाची वरात येणार होती आणि सकाळी मुलगी तिच्या खोलीतून बेपत्ता झाली.

नीमगाव पोलीस ठाण्याच्या प्रमुख श्रद्धा सिंह यांनी सांगितलं की, वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीमगाव पोलीस ठाण्यातील एका गावातील कुटुंबीय मुलीचं लग्न ठरवण्यासाठी शेजारच्या सीतापूर जिल्ह्यातील हरगाव गावात गेले होते. मुलीच्या वडिलांनी लग्न ठरताच मुलाला रोख रक्कम आणि दुचाकी दिली. लग्नाची वरात सकाळी येणार होती. मात्र, कार्यक्रम संपवून घरी परतताच नवरीच्या वडिलांना समजलं, की शेजारी राहणाऱ्या जवळच्या नातेवाईकाच्या मुलाने मुलीला आमिष दाखवून पळवून नेलं आहे.

तरुणीने मौल्यवान दागिने आणि रोख रक्कमही सोबत नेली. ही बातमी गावात आणि नातेवाईकांमध्ये पसरली. मुलगी ज्या मुलासोबत पळून गेली होती, त्याचे वडील काही काळच गावात राहायला आले होते, असं सांगितलं जातं. त्यांनी स्वतःचं घरही बांधलं होतं. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. दिवसभर मुलीचा शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही. बदनामी होण्याच्या भीतीने त्यांनी वधू पळून गेल्याची माहिती वराच्या कुटुंबीयांना दिली नाही. इकडे नवरदेव लग्नाच्या वरातीबरोबर निघायची तयारी करत होता. लग्नाची वरात घेऊन नवरदेव निघाला, मात्र वाटेत त्याला फोन आला आणि वधू फरार झाल्याचं समजलं. फोन उचलताच नवरदेव हादरला आणि तिथूनच वरात घेऊन घरी परतला .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close