काहीतरी थ्रिलिंग करायच्या नादात आपण संकट ओढावून घेत आहोत काय ?
सोशल मीडियावर दिवसभरात अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेतात. तर काही व्हिडीओ पाहून युजर्स च्या तोंडून ‘ भलतंच काही तरी काय ‘ ! किंवा ‘ असं धाडस करायची काय गरज होती ‘ ! असे शब्द आपसूकच बाहेर पडतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओ बद्दल सध्या तीच चर्चा होत आहे. चला तर पाहू या नेमक प्रकरण काय आहे.
बऱ्याचदा काहीतरी तुफानी करण्याच्या नादात लोक असे काही साहस दाखवतात, जे पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकवणारे असते. सध्या सोशल मीडियावरही तरुणीच्या साहसाचा असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
ज्यामध्ये एक व्यक्ती एका तरुणीला उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यावरून धक्का देतो. त्यानंतर दोरीच्या साहाय्याने तरुणी हवेत लटकू लागते, जे पाहताना काळजात एकदम धस्स होतं. बंजी जंपिंगचा हा थरारक व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक तरुणी बंजी जंपिंगचा थरार अनुभवताना दिसतेय. पण, हे साधंसूधं बंजी जंपिंग नाही. हे करण्यासाठी जितक्या साहसाची गरज आहे, तितकाच धोकाही आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी उंचावरून खाली धो-धो कोसळणाऱ्या धबधब्यावर प्रशिक्षकासोबत दिसते आहे. यावेळी तरुणीच्या पायाभोवती सेफ्टी रोप बांधला जातो, यानंतर तो प्रशिक्षक तिला धबधब्यातून खाली ढकलतो. ढकलल्यानंतर तरुणी कोसळत्या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने झेपावते आणि नंतर हवेत स्विंग करू लागते, अशाप्रकारे ती पुन्हा स्विंग करत धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाखाली येते. अशाप्रकारचे धोकादायक बंजी जंपिंग पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
बंजी जंपिंगचा हा थरारक व्हिडीओ @nature नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, धबधब्यावरून खाली उडी मारणे, तुम्ही हा प्रयत्न कराल का? हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी हा साहसी प्रकार असल्याचे म्हटले आहे; तर अनेकांनी हे ठिकाण नेमकं कुठलं आहे, असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी हे धोकादायक साहस केल्यानंतर महिलेचे काय झाले, असा प्रश्न विचारला आहे.