सातेगाव येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भव्य आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर संपन्न

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
सातेगाव येथे दिनांक ८ मार्च २०२४ महिला दिन व महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर वात्सल्य बाल रुग्णालय व पॉलिक्लीनिक अंजनगाव सुर्जी
वात्सल्य मॅटरनिटी व सर्जिकल होम अंजनगाव सुर्जी
AGB कॉम्प्युटराईस क्लिनिकल लेबॉरेटरी अंजनगाव सुर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. वैभव किशोरराव पेटे व डॉ. सौ. सुजाता वैभवराव पेटे यांच्या मार्फत भव्य आरोग्य तपासणी रोग निदान शिबिर घेण्यात आले. श्री. रामभाऊजी पेटे सभागृह येथे आयोजित या शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून वैद्यकीय अधीक्षक सामान्य रुग्णालय अंजनगाव सूर्जी डॉ.अमोल नालट सर उपस्थित होते. शिबिरा दरम्यान
डॉ. सौ.मेघा नालट मॅडम स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ , डॉ.निशांत अनिलकुमार गावंडे सर बालरोग तज्ञ व शिशुरोग तज्ञ , डॉ.सौ श्रद्धा निशांत गावंडे मॅडम जनरल फिजिशियन व स्त्रीरोग/त्वचारोग तज्ञ, डॉक्टर सौ सुजाता वैभव पेटे (खलोकार) जनरल फिजिशियन व स्त्रीरोगतज्ञ यांनी २५० पेक्षा अधिक रुग्णांचे रोगनिदान व उपचार केले. सोबत चि. पियुष बलंगे यांनी रक्त तपासणी आणि चि. सर्वेश जावरकर यांनी औषधी वितरण करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी श्री.वैभव किशोरराव पेटे,विठ्ठल दादा ढोले,सनी दादा शेळके या सामाजिक कार्यकर्त्यांचे व रुग्णसेवकांचे अनमोल सहकार्य लाभले. सर्व डॉक्टरांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व सामाजिक स्तरावरून कौतुक होत आहे.