सामाजिक

जागतिक महिला दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून आर्वीत महिलांचा सन्मान

Spread the love

 

राष्ट्रवादी कार्यालयात स्टेजवर महिलाराज

आर्वी /प्रतिनिधी
राजकीय व सामाजिक क्षेत्रातुन लोकहितासाठी कार्य करण्याचा वसा घेतलेल्या महिलांचे राष्ट्रवादी च्या पदाधिकार्यानी धुतले पाय गुलाबपुष्पा चा वर्षाव केला तसेच जिजाऊ ची प्रतिमा भेट देत केला सत्कार
दिनांक : 08/03/2024 रोजी जागतिक महिला दिनाच औचित्या निमित्त आर्वी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांचे नेतृत्वात वर्धा जिल्हाध्यक्ष शरद शहारे यांच्या सूचनेनुसार महिला ग्रामीण जिल्हाध्यक्षा अश्विनी शिरपूरकर, रोजगार व स्वयं रोजगार जिल्हाध्यक्षा रेखा वानखडे यांच्या उपस्थिती आर्वी येथील जनसंपर्क कार्यालयात राजकीय व सामाजिक क्षेत्रातून लोकसेवेचा वसा घेतलेल्या महिलांचा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या समर्पित महिला पदाधिकारी यांचं आगळ्या वेगळ्या पद्धतीने सन्मान करण्यात आला सायंकाळी पाच वाजता महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आर्वी विधानसभा जनसंपर्क कार्यालयात सन्मानाने निमंत्रित करून त्यांच्या प्रवेशाच्या मार्ग गुलाब पुष्पा नी सजवला होता कार्यालयात प्रवेशापूर्वी दिलीप पोटफोडे यांनी प्रत्येक महिलांचे पाय धुवून त्यांचा इतर सर्व पुरुष पदाधिकाऱ्यांनी पुष्प वर्षाव करून स्वागत केल तर पुढे लक्ष्मी च्या रूपात आलेल्या महिलांच्या पायाला कुंकू मरवट लाऊन कार्यालयात त्यांचा हस्ते सावीत्री बाई फुले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यां नंतर सर्व महिलांना शॉल पुष्पगुच्छ श्रीफळ देत सन्मान करत पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले की स्त्री हिच जगाची उदगाती असून आई म्हणून ममता देते, तर पत्नी म्हणून जबाबदारी देखील सांभाळते, ती मैत्रीण बनून धीर देते तर प्रेयसी म्हणून पाठीशी उभी राहते आजी म्हणून जीवनात कश्या पाऊल वाटा असाव्यात हे शिकवण्याच काम करणारि स्त्री हिच खरं देवाच रूप असल्याचे यावेळी पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना नमूद केल, कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव धानोरकर जिल्हा सरचिटणीस दिनकरराव कोयरे, आर्वी तालुका अध्यक्ष अरुणराव उमरे, आर्वी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर,कामगार जिल्हा उपाध्यक्ष अशपाक शेख, रशीद शेख, रवींद्र वानखेडे, युवक विधानसभा अध्यक्ष कमलेश चिंधेकर, युवक शहर अध्यक्ष पंकज नाकतोडे, युवक संघटक अजय मेश्राम, हरिचंद्र प्रधान, यांनी परिश्रम घेतलेत तर यावेळी प्रामुख्याने शुभांगी कलोडे,माधुरी सपकाळ, मीना बरवटकर,अर्चना धवणे, सोनाली जैन, सुषमा अतकरी , सोनाली चिंधेकर, वृंदा शिरभाते, अनिता राणे, शुभांगी धानोरकर, ममता गहलोत,किरण बरवटकर, बारंगे ताई,प्रतिभा पोटफोडे, योगिता राजुरकर, हर्षा सपकाळ, भारती पोटफोडे,उज्वला डोफे,व मोठ्या संख्येने महिला व ची उपस्थिती होती

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close