युक्रेन आणि रशिया युद्धासाठी भारतीय तरुणांची तस्करी
नवीदिल्ली / नवप्रहार मीडिया
रशिया आणि युक्रेन युद्धात भारतीय तरुणांचा सहभाग आढळून आल्याने प्लेसमेंट एजन्सी सीबीआय च्या रडारवर आल्या आहेत. सीबीआय ला मानवी तस्करीची शंका आहे.
याप्रकरणात सीबीआयने १३ शहरांमध्ये धाडी टाकल्या आहेत. सीबीआयने नोकरीच्या नावाखाली तरुणांना युद्धग्रस्त रशिया आणि युक्रेनला पाठविणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश केलाय. मुंबईसह दिल्ली, त्रिवेंद्रम, चंदीगड, अंबाला मदुराई आणि चंदीगड शहरात एकूण १३ ठिकाणी सीबीआयने धाडी टाकल्या.
सोशल मीडियावरून होत होतेय जाहिरात
खासगी विसा कन्सल्टन्सी कंपन्या आणि त्यांच्या एजंट्सविरोधात मानवी तस्करी केल्याचा सीबीआयने गुन्हा दाखल केलाय. आतापर्यंत ५० लाख रुपये रोकड, गून्ह्याशी निगडित कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल फोन, कॅम्प्युटर आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. अनेक संशयितांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. दरम्यान अशा धोकेबाज कन्सल्टंट एजन्सीच्या भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन सीबीआयने नागरिकांना केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियात चांगल्या पगार मिळत असल्याचं आमिष दाखवून तरुणांना भुरळ घातली जात आहे. आतापर्यंत ३५ भारतीयांना नोकरीच्या नावाखाली युद्धग्रस्त रशिया आणि युक्रेनला पाठवल्याची बाब समोर आलीय. दरम्यान युद्धात पाठवण्यात आलेल्या तरुणांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नोकरीच्या नावाखाली भारतीय तरुणांना रशियात नेले जात आहे. रशियात गेल्यानंतर त्यानंतर त्यांना युद्धाचं प्रशिक्षण देऊन रशिया आणि युक्रेन सीमेवर युद्ध भूमीवर लढाईसाठी पाठवलं जात होते.या युद्धात काही भारतीय तरुणांचा मृत्यू झालाय.
रशिया-युक्रेन युद्धात हैदराबाद आणि गुजरातच्या तरुणाचा मृत्यू
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात हैदराबादमधील एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. या तरुणाला नोकरीच्या नावाखाली एजंटने फसवणूक करून रशियन सैन्यात भरती केले होते. या तरुणाचे नाव असफान असून तो हैदराबाद येथील रहिवाशी होता. सुरक्षा सहाय्यकाची नोकरी असल्याचं सांगत असफानला रशियन सैन्यात भरती करण्यात आले होते. याआधी गुजरातमधील २३ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय.