आर्वी येथे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात फळे व भाजी विक्रेत्यांचे ठिय्या आंदोलन
आर्वी / प्रकाश निखारे
आर्वी येथे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयासमोर आज बाळा जगताप यांच्या नेतृत्वात फळ विक्रेते व भाजी विक्रेते यांनी विविध मागण्यांना अनुसरून नगर परिषद कार्यालय आर्वी येथे मुख्याधिकारी यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. फळ व भाजी विक्रेत्यांना इंदिरा चौक येथील ओट्यावर व्यवसाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. मात्र याठिकाणी शासनाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे अत्यावश्यक शासकीय सुविधा मिळाव्या त्याकरिता आज आंदोलन करण्यात आले.
व्यवसायाच्या ठिकाणी शेड देणे, त्या ठिकाणी विद्युत पुरवठा करणे, पाण्याची सोय उपलब्ध करून देणे, शौशालय व मुतारी ची व्यवस्था करून देणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याकरिता कचरा कुंडी उपलब्ध करून देणे. यांसारख्या मागण्यांना अनुसरून आज भाजी व फळ विक्रेत्यांनी प्रहार सोशल फोरम चे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने व्यावसायिक उपस्थित होते.