राज्य/देश

संदेशखाली दौऱ्यात आले भयानक सत्य समोर 

Spread the love
नवी दिल्ली: / नवप्रहार मीडिया
                       पश्चिम बंगाल मधील संदेशाखाली हे गाव तेथील आमदार आणि त्याच्या कार्यकर्त्यांच्या अमानुष अत्याचारामुळे चर्चेत आले आहे. हे प्रकरण उघड झाल्या नंतर देशातील कान्या कोपऱ्यात याची चर्चा सुरू झाली. यानंतर
एका स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) सहा सदस्यीय तथ्य शोध पथकाने रविवारी बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखालीस भेट दिली. यावेळी लैंगिक अत्याचारासह अन्य प्रकारही समोर आल्याचे पथकाने सांगितले आहे. दरम्यान, हा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही सादर करण्यात येणार असल्याचे समजते.पथकाचे नेतृत्व करणारे पाटणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एल नरसिंह रेड्डी म्हणाले की, कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी संदेशखाली येथील माझेरपाडा, नतुनपाडा आणि नस्करपाडा या तीन गावांना भेट दिली आणि पथकाच्या सदस्यांनी पीडितांशी चर्चा केली.
एल नरसिम्हा रेड्डी म्हणाले की, मोठ्या संख्येने लोकांनी छळवणुकीच्या तक्रारी केल्या आहेत. पथकाचा भाग असलेले माजी पोलिस महानिरिक्षक राजपाल सिंह म्हणाले, संदेशखालीतील लोकांच्या छळाच्या घटना भयानक आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलीस शेख शाहजहान आणि त्याच्या साथीदारांसोबत काम करताना दिसतात. शेख शहाजहानसह टोळीतील इतर सदस्यांनी ठिकठिकाणी जमिनी हडप केल्या आहेत. त्याने लोकांकडून पैसेही लुबाडले असून याचा काही भाग तृणमूल सरकारलाही पाठवण्यात आला होता, असेही पथकाने म्हटले आहे.
पथकाच्या सदस्या भावना बजाज म्हणाल्या की, आपण 28 ते 70 वयोगटातील 20 महिलांना भेटलो असून त्यामध्ये एका ७० वर्षीय वृद्धेने आपल्या कुटुंबावर झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगितली. त्याचप्रमाणे एका पिडितेच्या चेहऱ्यावर असलेल्या जखमांच्या खुणा अत्याचाराचा पुरावा देत होत्या. अत्याचार करणाऱ्यांपासून स्वतःला आणि आपल्या ४ वर्षांच्या मुलीला वाचविण्यासाठी ती महिला दररोज लपून बसत असे, असेही बजाज यांनी म्हटले आहे.
संदेशखालीमधील शेतजमिनी हडप करण्यासाठी आरोपींनी मत्स्यपालनाचा मार्ग अवलंबविल्याचेही समोर आले आहे. शेतजमिनींवर तब्बल दोन ते तीन वर्षे तलाव बांधून तेथे खाऱ्या पाण्यातील माशांची पैदास करण्यात आली. परिणामी, आता जमिनी परत मिळाल्यावरही जमिनीचा पोत खराब झाल्याने पुन्हा उत्पन्न घेण्यासाठी जवळपास आठ ते दहा वर्षांचा कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close