सामाजिक

१४६ वा गजानन महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा…!

Spread the love

 

बडनेरा शहर – ग्रामीण भागात ठिकठिकाणी माऊलीचा गजर

नितीन कदम यांची प्रमुख उपस्थिती

प्रतिनीधी/अमरावती

भक्तिमय वातावरणात गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त बडनेरा शहरासह ग्रामीण भागात गजानन महाराज मंदिर संस्थानामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.*
*बडनेरा येथे दरवर्षीप्रमाणे गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बडनेरा मधील विविध परिसरतून दर्शन घेण्यासाठी वैवैध्यपुर्ण संस्थानात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे बडनेरा शहर भागातली विवेकानंद कॉलनी येथील गजानन महाराज मंदिरात महाराजांची पालखी मिरवणूक, महाआरती, असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात आले. गजानन महाराजांची महाआरती सेवाभावी मंडळाचे सेवाधारी समाजसेवी नितीन कदम यांच्या हस्ते करण्यात आली. पालखी सोहळ्यामध्ये नितीन कदम यांनी सहाभगी होऊन भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध झाले.त्यानंतर परिसरातून महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आकर्षक देखावा, प्रत्येक संस्थानात महाप्रसाद व गजाननभक्ताची आलोट गर्दी यामुळे बडनेरा शहर व ग्रामीण भागात गण गण गणात बोते जयघोष घुमला.दरम्यान ग्रामीण भागातील भातकुली परीसरातही गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.श्रींच्या पालखी दर्शनासाठी आज भाविकांसह नागरिकांनी शोभायात्रा मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर हा सोहळा पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला.*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close