हटके

वडील आणि आईने प्रियकरांसोबत केले पलायन ; तीन मुले वाऱ्यावर

Spread the love

तीन महिने होऊन देखील दोघांपैकी कोणीही परतले नाही

छत्रपती संभाजीनगर / नवप्रहार मीडिया 

                      आई वडिलांशी साठी मुले हि जीव की प्राण असतात . मुख्यता आई साठी मुले ही तिचा जीव असतो कारण तिने नऊ महिने त्यांना गर्भात वाढवलेले असते. या काळात तिला काय काय वेदना सोसाव्या लागतात हे तिचे तिलाच माहीत असते. पण छत्रपती संभाजीनगर येथून एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे.येथे तीन मुलांना बेवारस सोडुन आई आणि वडील त्यांच्या प्रिंयकरांसोबत पळून गेले आहेत.घटनेला 3 महिन्यांचा कालावधी लोटून गेला आहे. पण दोघांपैकी एकही घराकडे परतला नाही.

 या घटनेनंतर शेजाऱ्यांकडून या मुलांचे पालनपोषण करण्यात आले, आता तिन महिन्यानंतर मात्र याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. संभाजीनगर शहरात एक जोडपे काही महिन्यांपासून किरायाने राहत होते. त्यांना तीन मुलं आहेत. असे असतानाच दोघांचे बाहेर वैयक्तिक विवाहबाह्य संबंध सुरू झाले. याबाबत या मुलींना काही कल्पना नव्हती. आपल्या मुलांकडे देखील त्यांचे लक्ष नव्हते.

आपल्या प्रेमात अडचण येत असल्याने अनेकदा ते मुलांना मारहाण करत असत. काही दिवसांनी दोघेही घर सोडून निघून गेले. आई प्रियकरासोबत निघून गेल्याने, वडील देखील प्रेयसीसोबत कुठेतरी निघून गेले. तीन महिन्यांनी देखील ते माघारी आले नाहीत.

यामुळे आई- वडिलांच्या प्रतीक्षेत मुलींच्या डोळ्यातील अश्रू क्षणभरही थांबले नाहीत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. या तिन्ही चिमुकल्यांनी घरात आपले पोटाची भूक भागविली. जेव्हा याची माहिती शेजाऱ्यांना मिळाली तेव्हा ते देखील मुलांच्या मदतीला आले.

नंतर शेजारच्यांनी पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. यावर सातारा पोलिसांनी खात्री करून हे प्रकरण बाल कल्याण समितीसमोर ठेवले. याबाबत आता पोलीस तपास करत आहेत. त्यांच्या आई वडिलांचा तपास केला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close