कुजलेल्या अवस्थेत सापडला महीलेचा मृतदेह

घाटंजी ता प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
पारवा-२/३/२४ रोजी पारवा पोलिस स्टेशन अंर्तगत येणा-या एडसि परिसरात एका ४० ते ४५ वर्ष वयोगटातील अज्ञात महीलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दगडाचे फटीत आढळून आला आहे. मिळालेल्या माहीती नुसार एका ईलेट्रीक कामगारला कामावर जात अस्ताना एडसी परिसरातील लगत परिसरात हा कुजलेल्या अवस्कथेत मृतदेह दीसला. ही माहीती पारवा पोलिसांना कळवली अस्ताना कर्तव्यावर असलेले पारवा स्टेशन ठाणेदार यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेता घटना स्थळी धाव घेतली अस्ताना मृतदेह महीलेचा असुन तो पंधरा ते २० दीवस आधीचा असावा हा प्राथमीक अंदाज दर्नशविण्यात आला आहे. सदर अज्ञात महीला मृत्यु कशाने झाला हे सध्या स्पष्ट नसले तरी त्याची चौकसी सुरु असून मृतदेह अवस्था पाहता जागेवरचं पंचनामा करुन अरुनावती नदी तीरावर त्याचे अंत्यविधी करण्यात आला. पारवा व आसपासच्या भागात कुणी महीला मिसींग झाली असल्यास वा अज्ञात महीले बद्ल माहीती असल्यास त्वरित पारवा पोलिस स्टेशन ला कळविण्याचे आवाहण पारवा ठाणेदार संदीप नरसाळे यांनी केले आहे व पुढील तपास पारवा पोलिस करत आहे.