शेतकरी कामगार युवा संकल्प जनसभा” दिनांक 3 मार्च रोजी आझाद मैदान यवतमाळ येथे आयोजित

यवतमाळ वार्ता:- अरविंद वानखेडे
महाराष्ट्र राज्यात शेतकरी कामगार युवकांसोबत प्रशासनाची भूमिका जाहीर जनसभेच्या माध्यमातून दिनांक माध्यमातून दिनांक ३ मार्च २०२४ रोजी ऐतिहासिक आझाद मैदान येथे आम आदमी पार्टी येथे आयोजित केली आहे. जनसभेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सरकार विषयी असलेली नाराजी तसेच आम आदमी पक्षाची शेतकरी कामगार युवकांसाठी भूमिका जाहीर करणार आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या मध्ये सातत्याने होत असलेली वाढ, शेतमालाला मिळत नसलेला भाव, वाढती महागाई बियाण्यांची वाढलेले दर शेतमालाला मिळत असलेला अल्प दर त्याचबरोबर शेतमजुरांची होत असलेली कुचंबना याकडे महाराष्ट्र शासनाचे कायम दुर्लक्ष झालेले आहे. आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये जनतेने निवडून दिलेल्या सरकारद्वारे जनतेसाठी कल्याणकारी उपक्रम शिक्षण आरोग्य सोबत अनेक जन सुविधा उपलब्ध करून जनमानसात एक आदराच स्थान निर्माण केले असताना याउलट महाराष्ट्रात मात्र निवडून आलेले सरकार हे तोडफोड करण्यात व्यस्त आहे. केंद्र सरकार निवडणूक प्रक्रियेमध्ये कशाप्रकारे आपण हस्तक्षेप करू शकतो यावर काम करत आहे निवडणूक आयोगाची नेमणूक असो की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या संदर्भात जनसामान्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे, सातत्याने तपास यंत्रणेचा होत असलेला दुरुपयोग पक्षपुडीसाठी पक्षांतरासाठी सर्व साम-दाम-दंड- भेद करून भारतीय जनता पक्ष एकापाठोपाठ भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले नेते यांना आपले मांडलिक बनवताना दिसत आहे. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे तेव्हा जाहिराती करून करोडचा खर्च करून जनतेची दिशाभूल करणे हा सर्व प्रकार सध्या महाराष्ट्रात चालू आहे. सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांवर महाराष्ट्रात दुर्लक्ष केल्या जात आहे धन दांडग्यांना पाठीशी घालून भ्रष्टाचारी नेत्यांना राजकीय संरक्षण दिल जात आहे. शेतकऱ्यांसोबत शेतमजूर कामगार हा सुद्धा महत्वाचा घटक आहे परंतु प्रशासनाचे या घटकावर कायम दुर्लक्ष झालेले आहे दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने 500 रुपये कामगारांना मजुरी दर निश्चित करून कामगारांना दिलासा दिला आहे हाच दर पुढे सातशे रुपये पर्यंत करण्याचा मानस पक्षाचा आहे. अशावेळी महाराष्ट्रात महिला कामगार अवघ्या दिवशी ते १५०-२०० रुपयात तर पुरुष कामगार कामगारांना तर 300 ते 350 प्रतीक रोज दराने काम करताना दिसतो या कामगारांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क आहे जगण्याचा हक्क आहे त्यासाठी आम आदमी पक्ष त्यांचा आवाज म्हणून कामगारांची भूमिका मांडणार आहे.
एकीकडे उद्योग प्रति वीज कंपन्या बियाणे कंपन्या खते कंपन्या यांना मोठ्या प्रमाणात फायदा पोहोचवण्याचे काम शासनातर्फे केले जाते परंतु शेतकऱ्यांच्या मालाला मात्र भाव देण्यासाठी सरकारकडून कुठलेही पावले उचलले जात नाही, यासाठी आम आदमी पक्ष जनसभेच्या माध्यमातून सरकारला जाब विचारणार आहे. एकीकडे यवतमाळ येथे माननीय पंतप्रधान यांच्या एक दिवसाच्या कार्यक्रमावर प्रशासनातर्फे यवतमाळ येथे तीस कोटीच्या वर खर्च केला जातो परंतु शेतकऱ्यांच्या शेताला कुंपण करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही आज सर्वसामान्यांचा विचार केला जात नाही याच विरोधात आम आदमी पक्षाची जनसभा आपल्या यवतमाळ शहरांमध्ये आयोजित केलेली आहे. या जनसभेला सर्व स्तरातील कामगार युवक शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती रहावें व आपली नाराजी व्यक्त करावी असे आव्हान आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम आदमी पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी केले. त्या सभेला आम आदमी पक्षाचे महाराष्ट्राचे सहभागी श्री गोपाल भाई इटालिया, महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष श्री अजित फाटके पाटील साहेब हे जनसभेला मार्गदर्शन करतील यावेळी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करण्यात येईल. अशी माहिती आज पत्रकार परिषद मध्ये आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री वसंतरावजी ढोके व राज्य संघटन सचिव एडवोकेट मनीष मोडक यांनी दिली.आशिष चमेडिया गुणवंत इंदूरकर आदी पत्रकार परिषदे ला उपस्तित होते.