विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये विज्ञान दिवस साजरा
विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन
विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून दैनंदिन जीवनामध्ये वापर करावा. – प्रा. अनुप अग्रवाल
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे संचालक राजेंद्र जोशी, मार्गदर्शक व परीक्षक प्रा.अनुप अग्रवाल. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रवी देशमुख यांच्या हस्ते शास्त्रज्ञ सि. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रमन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी ‘राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद’ आणि ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या’ अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. निमित्याने विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन वाढण्यासाठी व सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विज्ञान शिक्षक हर्षल नरोडे व मधुरा पिंपळे यांच्या मार्गदर्शनात अ’ व ब’ या दोन गटात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनात ४५ मॉडेल प्रदर्शित करण्यात आले. यामधून मॅजिकल फ्लुइड, शेतीपूरक व्यवसाय उपकरण, रेन सायकल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग, वनस्पतींना औषध देणारे आधुनिक तंत्रज्ञान, सोलर पॅनल प्रोटेक्टर या उत्कृष्ठ मॉडेलची निवड करण्यात आली. गट अ,’मधून प्रथम क्रमांक ओवी शेंडे, व गुंजन चौधरी,द्वितीय क्रमांक शुभेच्छा जगताप तर तृतीय क्रमांक मनवा कडूकार, व युगा तिरमारे या विद्यार्थिनीने प्राप्त केला. गट ब’ मधून प्रथम क्रमांक काव्या कोकने, द्वितीय क्रमांक आयुष राठी व नोमन पठाण तृतीय क्रमांक आरव डूकारे, व कृष्णा मोहोड यांनी प्राप्त केला. या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रा. अनुप अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून दैनंदिन जीवनामध्ये वापर करावा. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण मनीषा मलवार यांनी केले. निकाल वाचन आभा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा पिंपळे यांनी केले. तर आभाप्रदर्शन रेवती पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.