रेती घाटावर होत असलेल्या अवैध रेती उत्खननाला आळा घालून रेती डेपोमधून रेती देण्यात यावी – वरुण पांडे
वर्धा / आशिष इझनकर
वर्ध्या जिल्ह्यातील रेती घाटावर होत असलेल्या अवैध रेती उत्खननाला आळा घालून रेती डेपोमधून रेती देण्यात यावी तसेच निर्दोष ट्रक चालकावर व मालकावर गुन्हे नोंदवून त्यांचे गाड्या जब्त करणे बंद करा असे असहायचा निवेदन भारतीय जनता पार्टी अ. जा. मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश सचिव वरुणभाई पांडे यानी वर्धा जिल्हाधिकारी याना दिले.
मांडगाव रेती घाट, सावंगी रीठ व चौकुर पारडी रेती घाटावर वाळू माफियांकडून अनेक दिवसांपासून अवैध वाळू तस्करी सुरू आहे. महसूल चोरी रोखण्यासाठी राज्य सरकारने नवीन वाळू वितरण प्रणाली लागू केली. याअंतर्गत वाळू खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. आणि कोट्यवधी रुपयांना विकला जाणारा रेती घाट अवघ्या काही लाख रुपयांत डेपो म्हणून देण्यात आला. मात्र शासनाचे सर्व नियम धुडकावून लावणारे वाळू माफिया गेल्या एक महिन्यापासून रेती घाटातून अवैध उत्खनन करून वाळूची विक्री करत आहेत.रेती घाटावर परवानगी नसतानाही डोंगे (बोटी) वापरून रेती उत्खनन होत आहे.
हे अवैध वाळू उत्खनन लवकरात लवकर थांबवावे व डिपो मधून वाळू विक्रीची प्रक्रिया ऑनलाइन नोंदणीद्वारे सुरू करावी. जेणेकरून जनतेला स्वस्त दरात वाळू उपलब्ध होऊ शकेल, हा राज्य सरकारचा मानस आहे. तसेच निर्दोष ट्रक चालक व मलाकनवर गुन्हे नोंद करुण त्यांच्या गाड्या जब्त करण्यापेक्षा वाळू माफियांवर लवकरात लवकर करण्यात यावी. लवकरात करवाई न केल्यास आम्ही मोठे आंदोलन छेडू आशीर्वाद चेतावनी भारतीय जनता पार्टी अ. जा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव वरुण पांडे यांनी दिली आहे.
निवेदन देताना सचिन मून, प्रतिक नगराले, पवन तड़स, दत्ता झाडे, धीरज सोमकुंवर, आशिष मेश्राम,अमित माटे आदि उपस्थित होते.