अकॅडमितील विद्यार्थिनीची आत्महत्या ; सततच्या अपमानामुळे उचलले टोकाचे पाऊल
छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी
देशात घडणाऱ्या काही घटनांवरून गरिबी हा अभिशाप आहे का ? असा प्रश्न मनाला पडतो. शासकीय नोकरीचे स्वप्न घेऊन अकॅडमित प्रवेश घेतलेल्या 19 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. खानावळीच पैशे भरण्यास विलंब झाल्याने तिला साधा नाश्ता देखील दिला जात नव्हता. आणि तिला काळी आहेस असे म्हणून हिनवल्या जात होते . असा आरोप तरुणीच्या वडीलांनी केला आहे. त्यांच्या तक्रारी वरून अकॅडमितील पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लीना श्रीराम पाटील या तरुणीने दीड वर्षापूर्वी बजाजनगरातील पोलिस आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या गरुडझेप अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी आली होती. या अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी लीना हिच्या पालकांनी तीन टप्प्यात १ लाख २० हजार रुपये भरण्याची तयारी दर्शवली होती. यात प्रशिक्षण शुल्क, खानावळीचे प्रतिमाहच्या खर्चाचा समावेश होता. ही तयारी दर्शविल्यानेच या अकॅडमीत तिला प्रवेश देण्यात आला होता. अकॅडमीत प्रवेश घेतल्यानंतर लीना ही गरुडझेपच्या वसतिगृहात इतर प्रशिक्षणार्थी मुलींसोबत राहत होती. दरम्यान, प्रवेश घेतल्यानंतर या अकॅडमी आणि खानावळीचे शुल्क भरण्यास विलंब झाला. यानंतर तिला मानसिक त्रासाने ती नाराज झाली होती.
लीना पाटील हिचा छळ केला जात असल्याने टोकाचे पाऊल उचलत तिने गळफास घेतल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी मयत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गरुडझेप अकॅडमीच्या संचालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अकॅडमीचे संचालक प्रा. नीलेश सोनवणे आणि कर्मचारी खानावळीचे पैसे भरण्यास उशीर झाल्यावर तिला साधा नाश्ताही दिला जात नसल्याने आणि इतर प्रशिक्षणार्थीसमोर अपमानास्पद वागणूक देत होते.
‘तू काळी आहेस…. असेही हिणवले जात असल्याने ती तणावात होती. या मानसिक छळामुळे आणि मैत्रिणीसमक्ष अपमान केला जात होता. जेव्हा दिवाळीच्या सुट्टीत ती गावी गेली, तेव्हा तिने हा सर्व वृत्तांत कुटुंबीयांना देत अकॅडमीत जाण्यास नकार दिला होता. यानंतर कुटुंबीयांनी तिला धीर देत, फी भरली जाईल काळजी करू नकोस, असे म्हणत समजूत काढत तिला पुन्हा बजाजनगरात अकॅडमीत प्रशिक्षणासाठी पाठवले होते. त्रास असह्य झाल्याने लीनाने टोकाचे पाऊल उचलत मंगळवारी (दि.२०) अकॅडमीच्या बाथरूममध्ये गळफासने जीवन संपविले होते.