निवड / नियुक्ती / सुयश

पोस्टर स्पर्धेत कु.रेवती लांजेवार चे सुयश

Spread the love

आर्वी / प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या वाहतूक विभागाच्या वतीने वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आणि अपघात टाळण्यासाठी नियमांचे अंमलबजावणी होण्यासाठी असा संदेश देत वर्धा वाहतूक विभागाद्वारे १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीला रस्ता सुरक्षा सप्ताह राबवण्यात आला . या अभियानाअंतर्गत वाहतूक पोलिसांनी विविध कार्यक्रम आणि स्पर्धा घेण्यात आल्या . चालकांच्या सुरक्षेसाठी दरवर्षीप्रमाणे वर्धा वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानअंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम राबवून प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली आला.यात पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये मॉडेल ज्युनिअर कॉलेज आर्वी मधील कु.रेवती श्रावण लांजेवार द्वितीय पारितोषिक, तर निर्मल अनामत देवघरे ,राखी पुरुषोत्तम बिडकर यांना प्रोहोत्संपर बक्षीसे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मो.समीर याकूब व मोटार वाहन अधिकारी अजय चौधरी यांचा हस्ते पारितोषिक देण्यात आला .सहभागी विजेते ठरणाऱ्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आली. विध्यार्थ्यांना कलाशिक्षक प्रकाश निखारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयातील प्राचार्य पी. डी.देशमुख,काळे मॅडम, मेघे सर,ठाकरे सर, सुपनार सर ,केचे सर , थातोडे सर पांढरे सर चांडक सर व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी विध्यर्थिंनीची अभिनंदन केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close