शेती विषयक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक दिवसीय धरणे आंदोलन

Spread the love

शेतकऱ्यांच्या हितासाठी शरद पवार गट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत.
यवतमाळ वार्ता
अरविंद वानखडे
आज दिनांक 22-02-2024 ला स्थानिक महात्मा फुले चौक येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला हारअर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली ,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना मनोगत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी सांगितले की यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार यांचे विविध समस्येबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांना निवेदन सादर करताना शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराबद्दल मनोगत व्यक्त केले. अनेक मागण्या घेऊन शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव( एम. एस. पी.) प्रमाणे देण्यात यावा .शेतकऱ्यांचे शेतमालाला पिक विमा त्वरित देण्यात यावा अशी अतिवृष्टी ,बांधील शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, शेतमजुरांना रोजगार हमी योजनेतून काम देऊन शेती कामे रोजगार हमी योजनेतून काम देण्यात यावे, जिल्ह्यातील पिंपळा प्रकल्पातून शेतकऱ्यांचे शेतीला पाणी देण्यात यावे, रोजगारांना अन्याय करणारा खाजगीकरणाचा निर्णय रद्द करावा. शेतकऱ्यांची बँकेकडून होणारी कर्जाची वसुली थांबवून शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी, कृषी पंपाची वीज बिले माफ करू शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा देण्यात यावा ,महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने जी कर्जमाफी दिली जाते त्यामध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी,
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण राष्ट्रवादी संघटना शरद पवार गट सामील होणार असून यवतमाळ जिल्ह्यातून शंभर ते दीडशे लोक या आंदोलनामध्ये जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे या धरणे आंदोलनामध्ये सोळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते .प्रामुख्याने अशोकरावजी घारपळकर ,माननीय मनीषा काटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोषाध्यक्ष सतीश भाऊ भोयर, भावनाताई लेंडे ,प्रशांत वानखडे ,महिला सेलच्या योगिताताई मासाळ ,चेतनाताई राऊत ,रोशन पोटे, स्वप्नील अडकिते ,अशोक राऊत ,संतोष वैद्य ,संजय भिसे, सोळंके प्रशांत वानखेडे उपाध्यक्ष बाभुळगाव असे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close