एक वर्षा पूर्वी शासनाने फोडला रस्ता, शासन दुरुस्त करणार कधी ?
दवलामेटी ग्रामपंचायत ला गावकारी महिलांचा घेरावं.
दवलामेटी प्र
एक वर्षा पूर्वी (वेना) महाराष्ट्र प्राधिकरण पाणी पुरोठा विभागाने शासकीय पाणी पुरोठा योजने अंतर्गत पाईप लाईन टाकताना दवलामेटी गावातील सिमेंट रस्ते फोडले व दुरुस्ती करून देण्याचे मान्य केले होते. बरेचशा ठिकाणी फोडलेला रस्ता दुरुस्त करून ही दिले परंतु वॉर्ड क्र चार व पाच चवथी गल्ली येथील फोडलेला रस्ता अजून ही दुरुस्त न केल्याने गावातील महिला चिडून ग्रामपंचायत ला धडकल्या अजून ही अंदाजे फोडले ला रस्ता 400 ते 500 मिटर दुरुस्तीची वाट बघत आहे. हा वस्तीतील मुख्य मार्ग असल्याने गावकऱ्यांना ये जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे अनेकदा दुचाकी स्वार, सायकल स्वार या रस्त्याने पडले आहेत व दुखापत झालेल्या आहेत. गावकाऱ्यांनी अनेक दा मौखिक सूचना देऊन हि प्रशासन कुठली हि कार्यवाहि करीत नसल्याने आज परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दवलामेटी ग्रामपंचायत ला धडकल्या सरपंच गजाननजी रामेकर यांना लेखी तक्रार निवेदन दाखल केले त्वरित रस्त्याची दुरुस्ती चे काम सुरु केले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा या पत्रात देण्यात आला. नागरिकांचा समोरच सरपंच साहेबांनी वेना चा अधिकाऱ्यांना फोन लावला व योग्य नियोजन करून लवकरात लवकर रस्त्याचा दुरुस्ती चे काम करण्याची विनंती केले गावकाऱ्यांनी सांगितल्या प्रमाणे सरपंच गजाननजी रामेकर म्हणाले कि मी फक्त्त वेना ला विनंती करू शकतो दुरुस्ती लवकरात लवकरात करावी बाकी माझ्या हातात काहीच नाही दुरुस्ती ची जवाब दारीं महाराष्ट्ट प्राधिकरना ची होती व ते त्यांनी करावी. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुधीर करंजेकर यांचा नेतृत्वात वंदना मेश्राम, तनुजा घरडे, प्रतिभा चोरआमले, शोभा सूर्यवंशी, उषा राठोड, शेवंता ब्राम्हणे, रेणुका उईके, पुष्पा तांबेकर, आशा धुमटकर, बारूला बावणे, लक्षमी तांबेकर, सुमन उईके, शशिकला बसेशंकर, अनिता गौर, प्रमिला बापने, कल्पना उईके, माया खोब्रागडे, मंजू साखरे, दुर्गा गौर, कल्पना चिखले, ललिता पुजारी, कमल मेश्राम, सिधु सोमकुवर, कुंदा निकोसे, वनिता उईके, उषा नान्हे व वॉर्ड क्रमांक चार चा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच गजाननजी रामेकर :- रस्ता दुरुस्ती साठी आलेल्या अर्जा ची कॉपी व विनंती सह महाराष्ट्र प्राधिकरण ला आम्ही पाठवली असून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा ग्रामपंचायत तर्फे होत आहे. आमदार साहेबांचा सहकार्याने वेना चा अधिकाऱ्यांशी आम्ही बैठक घेऊ व लवकरात लवकर संबंधित रस्त्याचा दुरुस्तीचे काम करण्यास महाराष्ट्र प्राधिकरण विभागाला भाग पाडू.