हटके

रिसॉर्ट वर सुरू होती छमछम पोलिसांचा रिसॉर्ट वर छापा पडताच माजली पळापळ 

Spread the love

10-12 बारबाला आणि 48 ग्राहकांना अटक

  सातारा / प्रतिनिधी 

                  खिंगर येथील पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्ट वर  पोलीसांनी  छापा टाकत 10 -12″ बारबाला आणि 48 ग्राहकांना अटक केली आहे. याठिकाणी खत विक्रेते, डीलर यांची पार्टी सुरू होती. पोलिसांना पाहताच पळापळ और झाली. काही लोकांनी पोलिसांना चकमा देत आपल्या आलिशान गाड्या तेथेच सोडून पळ काढला आहे.पोलीस त्यांचा शोध घेत आहे.।

या छाप्यात पोलिसांनी दहा ते बारा बारबालांसह 48 जणांना तब्यात घेतलं आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेन्ट हाऊस हाॅटेलवर बारबाला नाचवल्या प्रकरणी दहा ते बारा मुलींसह 48 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यांच्यावर कारवाई झाली ते सर्व सोलापूर जिल्ह्यातील खते, औषधे आणि बी, बियाणेचे विक्रेते व डीलर असल्याची माहिती समोर येत आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख व ॲडिशनल एस पी आंचल दलाल यांनी या पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टवर छापा टाकून ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

यामध्ये पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टचा मालक डॉक्टर विजय दिघे ,आंबेघर तालुका जावळी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत पाचगणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दोन महिन्यापूर्वी देखील पाचगणी येथीलच कासवंड येथे स्प्रिंग व्हॅली या रिसॉर्टवर अशाच पद्धतीच्या बारबाला नाचवल्या गेल्या होत्या. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पाच डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पाचगणी येथील पाचगणी टेन्ट हाऊस या रिसॉर्टवर कारवाई केली आहे.

दरम्यान पोलिसांची धाड पडल्याचं लक्षात येताच काही संशयीत तसेच बारबालांसह डान्स करणारे पाच ते सहा जण घटनास्थळावर अलिशान गाड्या तशाच सोडून गेले असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close