राजकिय

शरद पवार गटाला बसणार हादरा , पवार गटाचा बडा नेता भाजपाच्या वाटेवर

Spread the love

सांगली / नवप्रहार मीडिया 

                   देशातील राजकारणात सध्या पक्ष परीवर्तनाची जी नांदी सुरू आहे. त्यामुळे कधी कोण कोणता पक्ष सोडुन अन्य पक्षात जाईल याचा काहीच भरवसा राहिला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवार यांच्या जवळचा एक नेता लवकरच भाजपा चे कमळ हातात घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. हा शरद पवारांसाठी मोठा धक्का ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे हा नेता दिल्ली येथील भाजपा नेत्यांच्या संपर्कात असून त्यांच्या बैठका देखील झाल्या आहेत अशी देखील चर्चा आहे.

शरद पवार गटाचा नेता भाजपच्या वाटेवर

आता काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसणार असल्याची माहिती आहे. भाजपमध्ये अनेक मोठे नेते गेल्या काही काळात आले आहेत. आता भाजपने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आणखी मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांचा निकटवर्तीय असलेला आणि पश्चिम महाराष्ट्रामधील एक बड्या नेत्याला भाजपमध्ये आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या काही काळात, लवकरच तो नेता भाजपवासी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. असं झालं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठं खिंडार पडेल. आता हा मोठा नेता कोण आणि तो खरचं शरदप पवार यांची साथ सोडून भाजपमध्ये जातो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसला मोठे धक्के

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक मोठे नेते, माजी आमदार पक्षांतर करताना दिसत आहेत. महाविकास आघआडीतील पक्षांमध्ये मोठी गळती सुरू असून काही दिवसांपूर्वी काँग्रेसला लागोपाठ मोठे धक्के बसले. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि गेल्या आठवड्यात अशोक चव्हाण यांसारखे काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी एकामागोमाग एक पक्षाला रामराम ठोकला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close