पत्नीला घाबरून त्याने केले असे की दोघांनाही खावी लागली तुरुंगाची हवा

समस्तीपुर / नवप्रहार मीडिया
जगात एकही असा व्यक्ती सापडणार नाही जो आपल्या पत्नीला घाबरत नाही असे मिस्कील पणे म्हटल्या जाते. पण एका पतीने खरोखरच आपल्या पत्नीचा आदेशाला फरमान मानत आपल्या प्रेयसीची हत्या केली.पोलिसांनी खुनाचा गुन्ह्यात पती – पत्नीला अटक केली आहे.
समस्तीपूर जिल्ह्यात 3 फेब्रुवारीला एका तरुणीचा मृतदेह सापडला. ती घटहो ओपी येथे राहणारी असल्याचे समोर आले. दरम्यान मुलीच्या आईने तिच्या मृत्यूची तक्रार उजियारपूर पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांचे पथक वेगाने कामाला लागले. पोलिसांनी मुलीचा कॉले रेकॉर्ड तपासला आणि तपासामध्ये धक्कादायक खुलासे होऊ लागले.
बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. या मर्डर केसमध्ये पोलीस तपास जसजसा पुढे जाऊ लागला तसतश्या धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. उजियारपूर आणि घटहो ओपीचे पोलीस याचा तपास करत होते.
मुलीच्या कॉल डिटेल्स तपासताना पोलिसांना एका नंबरवर संशय आला. हा नंबर सुल्तानपूर घटहो येथे राहणाऱ्या रामकांत मेहता यांचा मुलगा राजुकमार मेहता याचा होता.
यानंतर पोलिसांनी राजकुमार मेहता आणि त्याची पत्नी संजू देवी यांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासामध्ये दोघांनीही पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे प्रकरण अधिकच जटील बनत चालले होते. पण पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर दोघेही पोपटासारखे बोलू लागले.
नको त्या अवस्थेत पाहिले
मृत मुलीसोबत आपले विवाहबाह्य संबध होते, हे राजकुमारने मान्य केले. बायकोने आम्हाला नको त्या अवस्थेत पाहिले होते, असेही त्याने पुढे सांगितले.
त्यानंतर पत्नीचा माझ्यावर दबाव वाढवू लागली होती. त्या मुलीची हत्या कर नाहीतर मी तिची हत्या करेन, असे ती सांगत राहायची, असे त्याने पोलिसांना सांगितले. पत्नीच्या दबावात येऊन मी त्या मुलीला एग रोलमध्ये विष टाकून दिले. यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.
मृतदेह चादरीत गुंडाळला
विष खायला देऊन हत्या केल्यानंतर पती पत्नी कामाला लागले. त्यांनी अल्पवयीन मुलीचा मृतदेह चादरीत गुंडाळला आणि एका कारमध्ये ठेवला. यानंतर उजियारपूर ठाणे क्षेत्रातील बाबूपोखार भागात हा मृतदेह फेकून दिला.
आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. यानंतर पोलिसांनी दोघांचीही रवानगी तुरुंगात केली आहे.