स्कुल ऑफ स्कॉलर्स येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

धामणगाव रेल्वे :
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शैक्षणिक संस्था द्वारा संचालित स्कुल ऑफ स्कॉलर्स येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. यावेळी इयत्ता चौथीची विद्यार्थीनी प्रदिप्ता विश्वनाधा व सांची खाकोळे यांनी शिवजयंती विषयी मनोगत व्यक्त केले.इयत्ता तिसरीचा विद्यार्थी मंथन कडू याने शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत येऊन त्यांच्या जीवनावर आधारित महत्वाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता चौथीचा विद्यार्थी अद्वैत किशोर डोंगरे याने केले. या प्रसंगी नृत्य शिक्षक सचिन उईके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांचे चरित्र सादर करताना इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनी व इयत्ता दुसरीच्या मुलींनी अतिशय सुंदर नृत्य सादरीकरण केले. या प्रसंगी शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या भेटीचे दृश्य दाखवण्यात आले. यावेळी शाळेचे संगीत शिक्षक गौरव देवघरे आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर आधारित सुंदर पोवाडा सादर केले. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका के.साई नीरजा, आयोजन समिती आणि येलो हाउस सदस्यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.