सामाजिक

नांदगांव खंडेश्वर कडकडीत बंद , संयुक्त किसान मोर्चा चे आवाहनाला प्रतिसाद

Spread the love

 

नांदगांव खंडे / पवन ठाकरे
दि . १६
संयुक्त किसान मोर्चा चे वतीने आयोजित देशव्यापी ग्रामीण भारत बंदला नांदगांव खंडेश्वर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला . नांदगांव शहर व ग्रामीण भागात जनतेने आपली कामे बंद ठेवून भारत बंद मध्ये सहभाग घेतला . शहरातील व्यापारी / हॉकर्स व इतर सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी – शेतकरी विरोधी धोरणाचा प्रचंड विरोध केला . ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाच्या वेळी शेतकऱ्यांना सरकारने हमी भावाचा कायदा करण्याचे आश्वासन देवूनही आजपर्यंत कायदा केला नसल्यामूळे देशभरातील शेतकऱ्यांत सरकार विरोधात प्रचंड असंतोष आहे . त्यातच १३ फेब्रुवारीपासून दिल्ली येथे सुरु असलेल्या किसान आंदोलनावर सरकार करीत असलेल्या दडपशाही मूळे मोदी सरकार विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहे . गेल्या कित्येक दिवसा पासून संयुक्त किसान मोर्चा द्वारे शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केलेल्या अनेक मागण्या प्रलंबित आहे . स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, हमी भावाचा कायदा करा , सोयाबीनला ८ हजार रू . तुरीला १२ हजार , कापसाला १० हजार , हरभरा ९ हजार रु . हमी भाव जाहीर करा , शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरण रद्द करा ,पिक विमा क्षेत्रात सरकारी कंपणीची स्थापना करा व खाजगी कंपन्यांना हद्दपार करा . न मिळालेले दुष्काळी अनुदान व पिकविमा नुकसान भरपाई , शेतकरी – मजुर व सर्व कष्टकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर मासिक ५००० रु . चा पेंशनचा कायदा , शेतकऱ्यांचे व ग्रामीण भागाचे आर्थिक कंबरडे मोडणारा सुधारित विज कायदा रद्द करा , शेतीला दिवसा १२ तास विज पुरवठा करा, अन्नसुरक्षा मोडकडीस आणणारी “धान्या ऐवजी पैसे ” योजना रद्द करा , घरकुल अनुदान ५ लाख रु दया , सर्व सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण रद्द करा , नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा , मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी व बेरोजगारांसाठी सरकारी विभागांत त्वरीत नोकर भरती प्रक्रिया सुरु करा . या सर्व मागण्यांना घेवून संयुक्त किसान मोर्चाने आजच्या ग्रामीण भारत बंद ची हाक दिली होती . या बंद मध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभा, अ . भा . किसान सभा सहीत देशभरातील ५०० चे वर किसान संघटनांचा सहभाग होता . संयुक्त कामगार संघटना कृती समिती सहीत महाविकास – इंडिया आघाडीतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष , काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) शिवसेना ( उबाठा ) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच, अखिल भारतीय किसान सभा या आंदोलनाला सक्रीय पाठींबा होता . बंद दरम्यान नांदगांव शहरात शेतकऱ्यांनी रॅली काढली व बस स्टँड चौकात सभेचे आयोजन केले . यावेळी भाकपाचे नेते कॉ. तुकाराम भस्मे , किसान सभेचे सुनिल मेटकर , माकप अ. भा.किसान सभा जिल्हा सचिव श्याम शिंदे ,अशोक केसरखाने संजय मंडवधरे प्रकाश मारोटकर ,दिपक भगत , छोटू मुंदे , ,चित्रा वंजारी , प्रतिक्षा ढोके यांनी संबोधित केले . आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती . यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या . यावेळी विनोद तरेकर, संतोष सुरजुसे, ओमप्रकाश सावळे , माधव ढोके , प्रज्वल ढोके , हरिदास राजगिरे , हरिदास देशमुख, भैय्या पाटील धवस , योगेश अवझाडे, प्रतिक्षा ढोके ,ज्ञानेश्वर शिंदे, रामदास मते, दिलीप महल्ले, अनिल मारोटकर, दिनेश बावणे, आशिष रावेकर , विशाल शिंदे, मारुती बंड, बाबूजी सुने, चैतन्य साळवण, राजगुरू शिंदे, बाबा भाई, राजू राऊत, दीपक अंबाडरे, विठ्ठल झिमटे रमेश ठाकरे , वासुदेव चौधरी, हनुमान शिंदे, निशिकांत जाधव , अमोल धवसे , अक्षय पारस्कर , उमेश बनसोड, गौतम सोनोने , लक्ष्मण भगेवार , सागर कोल्हे , सचिन करडे सुनिल इंजळकर , चित्रा वंजारी , सर्फराज पठाण, प्रमोद ठाकरे , विष्णूपंत तिरमारे , श्रीकृष्ण वैदय , अविनाश कणसे , हरिदास राजगिरे , मुरलीधर वैदय , ज्ञानेश्वर भगवे , सचिन मेटकर , अनिल मारोटकर , दिलीप महल्ले , राजगुरू शिंदे ,एकनाथ मेटकर , गजानन भडके , संतोष बागडे , जया मंडवधरे , सुनंदा ढोक , ललिता घुगुसकर , अमोल धवस , दिनेश धवस , नरेश ठाकरे ,समशेर पठाण , बाबाराव इंगळे , अनिल मासोतकर , मनिषा कळंबे , सुरेखा ढोके , माधुरी लांबटकर , सोनाली वैदय , सुनिता ललिता वैदय ,भोयर ,कविता मंदुरकर, प्रियंका बावनकुळे , संध्या मेटकर , अंजूताई दायदार , पंचफुला शिंदे , शेवंता गोंडाणे , मनिषा वैदय , सोनाली इत्यादी सह मोठ्या संख्येने शेतकरी

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close