हटके

या कारणाने महिलांनी त्याला भररस्त्यात दिला चोप ; गळ्यात टाकले चपलेचे हार 

Spread the love

 बुलढाणा / विशेष प्रतिनिधी 

                   कायद्यात कितीही बदल केले तरी गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांत काही बदल होत नाही. महिला आणि तरुणी यांची छेड हा काही नवीन प्रकार नाही. पण कुठलीही गोष्ट मर्यादेपालिकडे गेली की मग मात्र त्याचा उद्रेक होतो.असच प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे घडला आहे. येथे एका व्यक्तीमुळे महिला आणि तरुणी इतक्या वैत्यागल्या होत्या की त्यांनी भररस्त्यात त्याला चोप तर दिलाच अहिवाय गळ्यात चपलेचा हार टाकून त्यांची धिंड देखील काढली.

         महिला, मुलींशी अश्लील वर्तन करून छेडछाड करणाऱ्या, त्यांना त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला महिलांनी बेदम चोप दिला. एवढंच नव्हे तर त्याला चोप देऊन त्याच्या गळ्यात चपलेचा हार टाकल्याची घटना घडली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर कुकडे असे आरोपीचे नाव असून तो बुलढाण्याच्या शेगाव शहरातील आहे. कुकडे याचे शहरात गुरुदेव मोटार ड्रायव्हिंग स्कूल असून त्या ठिकाणी येणाऱ्या महिला मुलींशी तो अश्लील वर्तन करायचा. त्यांची छेडही काढायचा. अनेकींना याचा त्रास झाला होता, मात्र भीतीपोटी महिला मुली समोर येत नव्हत्या. अखेर एका पीडित मुलीने हिंमत दाखवली आणि कुकडे याचा पर्दाफाश केला.
तिने काही मुलींच्या, महिलांच्या मदतीने कुकडे याचं पितळ उघडं पाडलं आणि त्याला भर रस्त्यात चोप देत बदडून काढलं. एवढंच नव्हे तर त्याच्या गळ्यात चपलेचा हार घालून, त्याची धिंड काढत त्याला पोलीस स्टेशन पर्यंत नेलं. मात्र संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींनी विनंती केल्याने, पोलिसांनी त्याला समज दिली. त्यानंतर कुकडे याने, पुन्हा अशी चुकी करणार नाही , असे लिहून देत माफी मागितल्यानंतर हे प्रकरण तिथेच थंड झालं. मात्र या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close