क्राइम

युवकाची दगडाने ठेचून हत्या. आरोपी फरार

Spread the love

अरविंद वानखेडे
यवतमाळ वार्ता
–यवतमाळ शहरातील गुरुनानक नगर येथे राहणाऱ्या मृतक सचिन माटे या युवकास अज्ञात मारेकर्‍यांनी दगडाने ठेचून ठार केले.
यवतमाळ शहरांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात असून त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तिसऱ्यांदा खून झाल्याची घटना घडली आहे.
काल सायंकाळी गुरुनानक सोसायटी गुडनी रोड या परिसरामध्ये एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला मृतकाचे नाव सचिन सुखदेव माटे वय 35 राहणार गुरू नानक नगर यवतमाळ असे असून तो मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.
मृतक सचिन हा विवाहित असून त्याला दोन अपत्य आहे काही दिवसा पूर्वी तो सासरी पुसद येथे राहावयास गेला होता मात्र दहा ते पंधरा दिवसा आधी तो पुसद धरून यवतमाळ येथे मुलं व पत्नी पुसदला ठेवून यवतमाळला परत आला असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली.
आमदार संदीप धुर्वे यांचे सुद्धा घर त्याच भागात असून आमदारांच्या घराच्या काही अंतरावरच ही घटना घडली या परिसरामध्ये नियमित काळोखाचे साम्राज्य असून त्या भागामध्ये अनेक अनैतिक कृत्य घडत असल्याचे सुद्धा उघडकीस आले आहे.
आमदार यांच्या निवासस्थानाच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारची प्रकाश दिव्यांची व्यवस्था नगरपरिषद यवतमाळ यांनी केली नसून आमदारांनी सुद्धा याकडे की बहुधा लक्ष घातले असते तर अशा प्रकारची घटना घडली नसती अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close