सेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्याचा गोळीबारात मृत्यू ; हल्लेखोर मॉरिस ची आत्महत्या

मुंबई / प्रतिनिधी
एकीकडे पुण्यात गँगवार होत असतांना मुंबईत राजकीय क्षेत्रातील लोकांवर गोळीबाराच्या घटना घडत आहेत. भाजपा आमदाराने अहिंडे गटाच्या पदाधिकाऱ्यावर केलेल्या गोळीबार नंतर शिवसेनेच्या उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. उपचारा दरम्यान जखमी पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर हल्लेखोराने देखील आत्महत्या केली आहे.
अभिषेक घोसाळकर असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पूत्र आहेत. दरम्यान, हल्लेखोरानेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर, हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते चिरंजीव असून उपचारासाठी त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर शिवसेनेच्या यूबीटी गटाच्या शिवसनिकांनी निषेधार्थ मॉरीसच्या कार्यालयाची पूर्णपणे तोडफोड करण्यात आली आहे.
या घटनेनंतर दहिसर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे या ठिकाणी आता अतिरिक्त पोलिस बळ मागवत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हल्लेखोर मोरीस याचाही मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अभिषेक यांची हत्या ही पूर्वनियोजित असल्याचा तपास अधिकाऱ्यांचा संशय असून दहिसर पोलीस तसेच क्राइम ब्रांच या प्रकरणी तपास करत आहे.