त्यागमूर्ती रमाई जयंती दिनी जि.प.उ. प्रार्थमिक शाळा घोटी येथे प्रश्न मंजुषा स्पर्धा संपन्न

घाटंजी तालुका प्रतिनिधि-सचिन कर्णेवार
बीआरसी, शिक्षण विभाग, पंचायत समिती घाटंजीच्या वतीने बीआरसी चे मानव लढे व स्वप्नील वातीले यांच्या संकल्पनेतून व परिश्रमातून आणि सुधाकरजी वांढरे गटशिक्षणाधिकारी घाटंजी, धमरत्न वायवळ अधिव्याख्याता डायट यवतमाळ, विस्तार अधिकारी सुनील बोंडे,विशाल साबापुरे यांच्या प्रेरणेतून “महापुरुषाची जयंती विद्यार्थ्यांची प्रगती” या उपक्रमांतर्गत त्यागमूर्ती रमाई जयंती दिनानिमित्त दि. ७/२/२४ ला माता रमाईच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन जि.प.उ. प्रा. केंद्रशाळा घोटी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती शाहीन शेख अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती होत्या तर प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख अविनाश खरतडे, बीआरसी मानव लढे,स्वप्निल वातीले होते.कार्यक्रम सुरवात उपस्थित मान्यवर,शिक्षक, विद्यार्थ्यांनी माता रमाईच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आली तदनंतर त्यांच्या जीवन कार्यावर आधारित विचार व्यक्त केले.तसेच विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांचे वैचारिक,शैक्षणिक, सामाजिक विचार रुजविणे आणि गुणवत्ता वाढविणे या उद्देशाने प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत अंश मोहुर्ले,रिंकी राठोड अनुश्री मोरे अनुक्रमे इयत्ता 5,6,7 निहाय प्रथम आणि वैष्णवी आत्राम, प्रणय खरतडे, प्रतिज्ञा इंगोले अनुक्रमे इयत्ता 5,6,7 निहाय द्वितीय क्रमांक प्राप्त केला.या विद्यार्थ्यांना बीआरसीच्या वतीने बक्षीस म्हणून प्रमाणपत्र, रजिस्टर, पेन व पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन विनोद आडे सर, तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर पुसनाके सरांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीआरसी, मुख्याध्यापिका छाया सोनटक्के ,वर्षा कटकमवार, सुनिती कांबळे , विद्या भगत, तबसुम काजी आणि विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.