क्राइम

मित्रावर सपासप वार करून हत्या ; हल्लेखोराची तुटली बोटे

Spread the love
तारदाळ / प्रतिनिधी

    बार मध्ये मित्रांसोबत दारू प्यायला बसलेल्या दोन मित्रांमध्ये राडा झाल्याने एकाने दुसऱ्याची हत्या केल्याचा भयावह प्रकार खोतवाडी – तारदाळ मार्गावरील महादेव मंदिर परिसरात रात्री १०.३० वा. घडली आहे. या हल्ल्यात मारेकऱ्याची बोटे तुटली आहेत. खुनातील मुख्य सूत्रधार विनायक चौगुले आहे. त्याने दीपक कांबळे (वय २६, रा. तारदाळ)  क्रूरपणे हल्ला केला. डोक्यात सपासप सुमारे २२ वार केलेत.

झटापटीत संशयित हल्लेखोर विनायक चौगुले जखमी झाला असून, त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा संशयित म्हणून अंकुश व रेहान या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली. जखमी मयूरला आयजीएम रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे त्याला मृत घोषित केले.

त्यानंतर त्याच्या नातेवाईक, मित्रांनी रुग्णालयात गर्दी केली होती. रुग्णालयात शिवाजीनगर पोलिस  ठाण्याचा बंदोबस्त तैनात होता. पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मयूर कांबळे व हल्लेखोर चौगुले दोघे जिवलग मित्र होते. यापूर्वी दोघांमध्ये सतत वाद व्हायचा; मात्र दोघांची समजूत काढून वादावर पडदा पडत होता

काल सायंकाळी दोघे विनायक चौगुले आणि मयूर दीपक कांबळे काही मित्रांसमवेत सांगली नाका परिसरातील एका बारवर दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी मयूर व विनायकमध्ये वाद झाला. वादानंतर सर्वजण बाहेर पडले आणि घराच्या दिशेने दुचाकीवरून निघाले. मयूर कांबळे व हल्लेखोर चौगुले दोघे जिवलग मित्र होते. यापूर्वी दोघांमध्ये सतत वाद व्हायचा; मात्र दोघांची समजूत काढून वादावर पडदा पडत होता.

तारदाळ खोतवाडी मार्गावर मयूरवर वार झाला. दुचाकीवरून कोसळलेला मयूर जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागला; मात्र सोबतच्या तिघा मित्रांनी त्याला पुढे रस्त्यातच गाठले. चौगुलेने दोघांच्या मदतीने मयूरच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. रक्तबंबाळ मयूर रस्त्यावर पडला. याची माहिती मिळताच मयूरच्या मित्राने चारचाकी वाहनातून त्याला आयजीएम रुग्णालयात नेले.

हल्लेखोराची बोटे तुटली

खुनातील मुख्य सूत्रधार विनायक चौगुले आहे. त्याने क्रूरपणे हल्ला केला. डोक्यात सपासप सुमारे २२ वार केलेत. या हल्ल्यात त्याचीच बोटे तुटली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close