क्राइम

सागवान तस्करांना अटक ; गोबरवाही पोलिसांची कारवाई

Spread the love

भंडारा / प्रतिनिधी

उच्च प्रतीचे फर्निचर बनविण्यासाठी सागवान लाकडांचा उपयोग होतो. खुल्या बाजारात सागवान लाकडाची किंमत जास्त असल्याने अनेक लोकं पैशे वाचविण्यासाठी  दोन नंबरच्या म्हणजेच चोरीच्या लाकडाचा उपयोग करतात. चोरीचर सागवान विकणारे चोरटे जंगलातील सागवान झाडे कापून ती चोरून नेतात आणि त्याची विक्री करतात.   हेक्टर आर या शासकीय जागेवरील सागवान वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल करत असल्याचे आसलपाणी साझा क्र.34 चे तलाठी अनिल गणेश डोरले यांनी गोबरवाही पोलिसात तक्रार दिली.घटनेचे गांभीर्य ओळखत गोबरवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि चोरट्यांना अटक केली.

या कारवाईमध्ये त्यांच्याकडून 1 लाख रुपये किंमतीचा सागवान लाकूड फाटा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. सदानंद वाहणे (50) आणि वीरेंद्र वाहणे (27) रा. मोठागाव असे पोलिसांनी अटक केलेल्या बापलेकांचे नावं आहेत.

वनविभागाच्या राखीव क्षेत्रातून सागवान झाडांची कत्तल करून रात्री त्याची छुप्या पद्धतीने वाहतूक करण्यात येते. अनेकवेळा याकडे हेतू पुरस्सर दुर्लक्ष केल्या जाते.

भागात उच्च दर्जाचे सागवनाचे लाकूड विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यासह परराज्यातील लाकूडमाफियांचा डोळा या जंगलांकडे असतो. जंगलतोड करण्यासाठी आणि तोडलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठी वनविभागाचा परवाना असणे आवश्यक आहे. लाकूडतोड करण्यासाठी वनविभागाकडून जितकी झाडे तोडण्याची परवानगी दिलेले असते, तितकीच झाडे तोडणे गरजेचे आहे. मात्र अनेकदा छुप्या मार्गाने जंगलतोड करून त्याची वाहतूक होत असते. वनविभागाने अशा लाकूडमाफियांचा अनेकदा मुसक्या आवळून कडक कारवाई देखील केली आहे. मात्र अलीकडे या वनक्षेत्रात पुन्हा लाकूड तस्करांची टोळी सक्रिय झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close