एमबीबीएस डॉक्टर मारतो पोलीस स्टेशनच्या चकरा

भंडारा तालुका प्रतिनिधी- अमोल खोब्रागडे
जवाहरनगर, पोलीस स्टेशन जवाहरनगरचे हद्दीतील स्थानिक एमबीबीएस डॉक्टर मागील दोन दिवसापासून पोलीस स्टेशन जवाहर नगरच्या चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे, आठवड्यापूर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात किशोरवयीन युवकाचा पीलिया या रोगाने मृत्यू झाला, सदर युवकाची या डॉक्टरांच्या खाजगी रुग्णालयात भरती करून उपचार सुरू होते.
त्या दरम्यान युवकाची परिस्थिती खालावल्याने, युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
या घटनेमुळे परिसरात डॉक्टरांच्या विरुद्ध तीव्र असंतोष नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे, तसेच घटनेच्या पाच दिवसानंतर मृतकाच्या वडिलांनी पोलीस स्टेशन जवाहर नगर येथे त्या डॉक्टरावर कार्यवाही करण्यासंदर्भात पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिला होता, त्यानुसारच संबंधित डॉक्टर हा जवाहरनगर पोलिस स्टेशनच्या आत्ता घीरट्या मारू लागला आहे. परंतु अद्यापही देखील त्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारचा ठाणेदाराकडून निर्णय घेण्यात आला नाही व त्या डॉक्टरांवर गुन्हाही दाखल करण्यात आला नाही. परंतु या प्रकरणाचा तपास आता कुठपर्यंत जातो या विषयी परिसरात चर्चाना ला उधाण आले आहे
मृतकाच्या वडिलांनी दिनांक 30 जानेवारी रोजी तक्रार अर्ज दिला आहे, सदर प्रकरण चौकशीत आहे.
सुधीर बोरकुटे, पोलीस ठाणेदार जवाहर नगर