भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न व्ही.पी युथ फाऊंडेशन चा अभिनव उपक्रम

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : कारंजा येथील रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हा ध्यास घेऊन श्युअरटेक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर यांच्या सहकार्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन पारडी येथील जि.प प्राथमिक शाळा येथे करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिरामध्ये ह्रदयरोग संबंधित तपासणी, हाडांची संपूर्ण तपासणी, स्त्री रोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, मूत्ररोग तपासणी, लहान मुलांचे आजार, मेंदू संबंधीत आजार, ब्लड प्रेशर तपासणी, शुगर तपासणी, एचआयव्ही, एड्स,रक्त चाचणी सारख्या विविध चाचण्या मोफत करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला सहाय्यक उप वन निरिक्षक अधिकारी मा. बोबडे साहेब, उपविभागीय अधिकारी, आर्वी मा. विश्वास सिरसाट साहेब, कार्यकारी अभियंता म.राज्य विद्युत वितरण मंडळ आर्वी विभाग मा. प्रशांत गायकवाड साहेब, गटविकास अधिकारी पं.स कारंजा (घा) मा. प्रविण देशमुख साहेब, तहसिलदार कारंजा मा. ऐश्वर्या गिरी मॅडम, तहसिलदार आष्टी मा. कुमावत साहेब, पो.स्टेशन तळेगाव ठाणेदार मा. संदिपजी धोबे साहेब, पो. स्टेशन कारंजा पवार साहेब उपस्थित होते.
या आरोग्य शिबीराचा एकूण ११९७ रुग्णांनी लाभ घेतला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विश्वभुषन विनोदराव पाटील व मित्र परिवाराने केले होते.