Uncategorized

शरद पवार पक्षाचे सदस्य नाही तर अध्यक्ष कसे ? अजित पवार गटाच्या वकिलाचा युक्तिवाद 

Spread the love

मुंबई / प्रतिनिधी

                     राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात आमदार अपात्रता प्रकरणी  निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सुनावणी पार पडली. अजित पवार गटाच्या  वकिलांनी सुनावणीमध्ये महत्त्वाचा युक्तिवाद केला. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नसून, शरद पवारांसह पटेल, तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता झाल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील विरेंद्र तुळजापूरकर यांनी केला.

घटनेनुसार शरद पवार  हे पक्षाचे सदस्य नाहीत मग अध्यक्ष कसे होऊ शकतात? असा सवालही अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. तसेच विधीमंडळात किती बहुमताला सर्वाधिक महत्व असल्याचाही युक्तिवाद त्यांनी केला.

अजित पवारांच्या वकिलांचा युक्तिवाद काय?

  • राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार नाही.
  • शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची निवडणूक न घेता थेट नेमणूक करण्यात आल्या.
  • राष्ट्रवादीच्या घटनेत नमूद असलेल्या प्रार्थमिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकाच घेतलेल्या नाहीत.
  • जर पक्षात निवडणुका पार पडल्या असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले नाहीत.
  • तुम्ही निवडणूक घेऊ असं सांगितलं होतं, पण स्ट्रॅकचर कुठे आहे?
  • राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक घेण्यात आली होती, शरद पवार हे अध्यक्ष होते. स्टेट कमिटीची निवडणूक करण्यात येणार होती. सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याची
  • विनंती केली. मात्र त्यावेळी शरद पवारांनी निवडणूक न घेताच सगळ्यांची नेमणूक केली.
  • पक्षामध्ये मतभेद आहे, कोणत्या गटाला किती पाठिंबा आहे आणि कोणता गट खरी राष्ट्रवादी आहे याचा वाद आहे.
  • प्रदेशाध्यक्ष नेमकं कोण आहे हा मुद्दा नाही, पण जी व्यक्ती बोलते की मी प्रदेशाध्यक्ष, खजिनदार आहे, ते पार्टीच्या संविधानानुसार सह्या करू शकतात का य़
    पक्षाच्या या कमिटी फक्त पेपरवर लिहिल्या आहेत.
  • शिवसेनेच्या बाबतीत संविधानाचा विषय येतो. आपल्याला त्यात वेळ घालवायचा नाही
  • सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनुसार 3 गोष्टी बघायच्या आहेत. संविधान, विधिमंडळ बहुमत आणि संविधानिक बहुमत.
  • घटना नेमकं काय आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे.
  • पार्टीमध्ये बहुमत असेल तर मग ते पार्टीच्या स्ट्रक्चर नुसार असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे विधिमंडळ बहुमत बघायला हवं.
  • ऑर्गन्यजेशन स्ट्राक्चरमध्ये किती बहुमत आहे हे देखील बघितलं पाहिजे.
  • त्यांच्याकडून विधिमंडळ पक्षाचं बहुमत सिद्ध करता आलं नाही.
  • 15 सप्टेंबर रोजी घोषणा केली की शरद पवार यांनी कार्यकारिणी जाहीर केली आणि इतर पदंदेखील जाहीर केली. घटनेनुसार त्यांना ही पदं जाहीर करणं बरोबर आहे का?
  • ते या पार्टीचे मेंबर आहेत का? आणि जर नसतील मग ते अध्यक्ष कसे होऊ शकतात?
  • शरद पवार यांनी एकट्यांनी पत्रकार परिषद घेऊन कसे ठरवले की आम्हाला सरकारमध्ये जायचे नाही. राष्ट्रवादीच्या घटनेत कुठे लिहिले आहे की आमदारांनी शिवसेनेबरोबर जाऊ नसे किंवा भाजपबरोबर सरकार बनवू नये? तुम्हीच 2014 ला भाजप सरकारला पाठिंबा दिला होता.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close